उन्हाळ्यात व्यायाम करताना ‘ही’ काळजी आवश्य घ्यावी..

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उन्हाळ्यात व्यायाम करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये व्यायाम करताना शरीराचे तापमान वाढते. यामुळे व्यायाम करणे त्रासदायक ठरते. जास्त घाम आल्यामुळे शरीर डिहायडेट होऊ शकते. तरीही व्यायाम केल्यास आपण आजारी पडू शकतो. मात्र, त्यामुळे व्यायाम करणे टाळू नये. काही काळजी घेतल्यास उन्हाळ्यातही व्यायाम करताना अडचणी येणार नाहीत.

उन्हाळ्यात सकाळी ६ वाजताच वर्कआउट उरकून घ्या. बाहेरील तापमान ८ ते ९ वाजेपर्यंत वाढते. त्यामुळे सकाळी लवकर उठून व्यायाम करा. त्यामुळे दिवसभराची सर्व आवश्यक काम आटपू शकता. काही लोक एक्सरसाइज केल्यानंतर लगेच बाथरूममध्ये आंघोळीसाठी जातात. परंतु एक्सरसाजनंतर काही वेळ आराम करावा. त्यामुळे शरीराचे तापमान कमी होईल. सुमारे एक तासानंतर आंघोळ करावी. उन्हाळ्यामध्ये एक्सरसाइज करताना फार घाम येतो. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे.

सकाळी उठल्यानंतर २ ग्लास पाणी प्यावे. त्यानंतर एक्सरसाइज करावी. एक्सरसाइज करताना मध्येच तहान लागली तर पाणी प्यावे. यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमी होऊन डिहायड्रेशन होणार नाही. व्यायाम करताना एनर्जी डिंकचं सेवन करणे शक्यतो टाळावे. एनर्जी डिंक्समध्ये ग्लूकोज अधिक असते. जे शरीरामध्ये जाऊन एनर्जीमध्ये कनवर्ट होते. सैल आणि हलक्या रंगाचे कपडे घालून व्यायाम करावा. कपडे शरीराला चिकटल्यामुळे उकाडा जास्त जाणवतो.