तुम्ही शेअर मार्केट, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताय? कोणत्या परिस्थितीत किती Tax भरावा लागेल? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आताच्या कोरोना संकटात शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड यात गुंतवणूक वाढताना दिसत आहे. तर ज्या लोकांना गुंतवणूक करायची आहे. ते लोक आता शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडकडे वळत आहेत. परंतु, यामध्ये जो नफा मिळतो त्या नफ्यावर टॅक्स भरावा लागतो हे अनेक गुंतवणूकदारांना माहित नसतं. तर शेअर बाजारातील नफ्यावरून अर्थात दीर्घ अथवा अल्प मुदत आहे याववरुन टॅक्स अवलंबून असतो. कोणत्या परिस्थितीत किती कर भरावा लागेल तसेच, कुठल्या परिस्थितीत टॅक्सचा बचाव करता येईल ते जाणून घ्या.

शेअर बाजार (Share Market) :

अल्प मुदतीतील भांडवली नफा –
१२ महिन्यांच्या आत शेअर्सची विक्री करुन नफा कमावला तर त्या नफ्याला अल्प मुदतीतील भांडवली नफा असे म्हणतात. यामध्ये १५ % टॅक्स भरावा लागतो. परंतु, शेअर्स विक्रीत तोटा झाल्यास आगामी आठ वर्ष तोटा दाखवू शकता.

दीर्घ मुदतीतील भांडवली नफा –
१२ महिन्यांपर्यंत शेअर्स ठेवून नंतर ते विकून त्यामधून नफा कमावला तर त्याला दीर्घ मुदतीतील भांडवल लाभ असे म्हणतात. यात १ लाख रुपयांपेक्षा अधिक नफा झाला असेल तरी त्यावर १० % टॅक्स द्यावा लागणार आहे. तोटा झाल्यास तो आगामी ४ वर्षे दाखवू शकता. दीर्घ मुदतीतील भांडवल लाभानेच तोट्याची वजावट केली जाऊ शकणार आहे.

डेट्रेडिंग –
शेअर्स आज विकत घेऊन आजच विकत असाल तर त्याची वितरण (Delivery) घेत नसाल तर त्यामधुन मिळणारा नफा हे तुमचे व्यावसायिक उत्पन्न मानले जाते. म्हणून ग्राहकाच्या एकूण उत्पन्नात ते कनेक्शन केले जाते. तसेच आयकरच्या स्लॅबनुसार त्यावर टॅक्स आकाराला जातो. यामध्ये तोटा झाला असेल तर ते पुढे दाखवता येते, परंतु केवळ ४ वर्षासाठीच. या उत्पन्नातील तोटा केवळ याच उत्पन्नातूनच वजावट केले जाऊ शकते.

म्युच्युअल फंड (Mutual Fund) –

इक्विटी फंड (Equity Fund) –
वारशाच्या आतमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडाच्या (यामध्ये ६० % पेक्षा अधिक गुंतवणूक इक्विटीमध्ये असते) युनिट विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यावर १५ % अल्प मुदती भांडवली नफा टॅक्स आणि ४ % अधिभार आकाराला जातो. गुंतवणुकीचा कालावधी १ वर्षापेक्षा अधिक असेल तर १० % दीर्घ मुदतीचा भांडवली नफा टॅक्स तसेच ४ % अधिभार आकाराला जातो. तर हा नफा १ लाख रुपयांपेक्षा अल्प असेल तर त्यावरून कोणताही टॅक्स आकाराला जाऊ शकत नाही.

डीडीटी (Dividend Distribution Tax) –
इक्विटी म्युच्युअल फंडांनी दिलेला लाभांश करमुक्त (Tax free)असतो, मात्र, एएमआय ११.६४८ % दराने लाभांश डिलिव्हरी टॅक्स भरतात.

डेट फंड (Debt fund ) –
डेटफंडामध्ये अल्प-मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी कमीतकमी काळ ३ वर्षे आहे. गुंतवणूकीला ३ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विक्री केल्यास त्यामधून झालेल्या नफा गुंतवणूक दाराच्या उत्पन्नामध्ये समावेश करतात. तसेच त्यावर Income Tax च्या स्लॅबनुसार टॅक्स आकारला जातो. ३ वर्षांनंतर विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यावर २० % कर आकाराला जातो. या फंडातील गुंतवणूकीत तोटा झाला तर ग्राहक ८ वर्षापर्यंत पुढे दाखवू शकते. कुठल्याही उत्पन्नामध्ये त्याचा समावेश करू शकणार आहे.

डीडीटी (Dividend Distribution Tax) –
डेट फंडांमध्ये गुंतवणूकदारांना लाभांश वितरित करण्यापूर्वी फंड हाउसेस २९.१२० % दराने लाभांश वितरण टॅक्स भरतात.