दीपिका पदुकोणच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अक्षय पुराणिक ) –  बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदूकोण हीचा आज वाढदिवस. मॉडेलिंगमधून आपल्या करिअरला सुरूवात केलेल्या दीपिकाने अल्पावधीतच खूप नाव कमावले. ती आता १०० कोटी क्लबची क्वीन झाली आहे.

भारताचे बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण आणि उज्ज्वला पदुकोण या दांपत्याच्या पोटी कोपनहेगन (डेन्मार्क) येथे दीपिकाचा जन्म झाला. एक छोट्या गटात राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत ती बॅडमिंटन खेळली, परंतु एक फॅशन मॉडेल होण्यासाठी तिची खेळण्यातली आवड कमी करून ती चित्रपटाकडे वळली आणि ऐश्वर्या या कन्नड चित्रपटातून चित्रपटसृष्टीत २००६ मध्ये पदार्पण केले.

तिची मातृभाषा कोकणी आहे. बेंगळुरूमधील सोफिया हायस्कूलमध्ये तिचे शिक्षण झाले. दीपिका पदुकोण ही जगातली सर्वोत्तम दहाव्या क्रमांकाची अभिनेत्री असल्याचे फोर्ब्जच्या यादीवरून समजते. तिचे १ जून २०१५ ते ३१ मे २०१६ या काळातले उत्पन्‍न एक कोटी डॉलर्स असल्याचा अंदाज आहे.तिने १० कोटी आयकर भरला आहे.

दीपिकाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली. २००६ मध्ये दीपिकाने कन्नड चित्रपट ऐश्वर्या मध्ये अभिनेता उपेंद्र याच्यासोबत भूमिका करून चित्रपटात काम करायला सुरुवात केली. त्यानंतर २००७ मध्ये फराह खानच्या ओम शांती ओम मध्ये अभिनेता शाहरूख खानसोबत प्रमुख भूमिका केली. या चित्रपटाने तिला मोठे व्यावसायिक यश आणि पुरस्कारही मिळवले.

तिच्यात अजून एक कला आहे ज्याची जाणीव कोणालाच नाहीच. पण त्या कलेचा पूरावा आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दीपिकाने सातवीत असताना एक कविता लिहिली होती. ती तिने आता सोशल मीडियावर शेअर केली. ती शेअर करत असताना तिने लिहिले की, मी सातवीत असताना कविता लिहिण्याचा प्रयत्न केला होता. दीपिकाच्या या कवितेचे नाव आहे आय अ‍ॅम.

कविता अशी आहे…

आय अ‍ॅम अ चाईल्ड विथ लव आय अ‍ॅन्ड केअर, आय वंडर हाओ फॉर द स्टार्स रिच, आय हिअर रश ऑफ द वेव्स, आय सी द डीप ब्लू सी… तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तिच्या या कलेचे कौतुक अनेकांनी केले.

पण हा सगळा आनंद एकीकडे कडे आणि त्यात दुःखाची जोड जीवन म्हणजे एक प्रकारचा वळणावळणांचा खडतर रस्ताच आहे. या वाटेत जितकी वळणं आहेत तितकेच खाचखळगेही आहेत. आता ते तुम्ही कसे पार करता यातच खरं कौशल्य दडलेलं आहे. मुळात ही वाट चालताना अनेकजण अगदी सहजपणे ती पार करतात. पण, काहींच्या वाट्याला येणारी वळणं ही इतकी खडतर असतात, ज्याच्यापुढे मग आपल्याला नमतं घ्यावं लागतं. या सर्व परिस्थितीकडे नैराश्याच्या नजरेतून पाहिलं जातं.

अभिनेत्री दीपिका पदुकोणने अशाच परिस्थितीचा सामना केला होता. २०१४ मध्ये तिच्यावर क्लिनिकल डिप्रेशनचे उपचार करण्यात आले होते. खुद्द दीपिकाने याचा खुलासा बऱ्याच कार्यक्रमांमध्ये केला आहे.

– दीपिका पदुकोण ने केलेले चित्रपट आणि त्यासाठी तिला मिळालेले पुरस्कार.

२००६ ऐश्वर्या कन्नड सिनेमा

२००७ ओम शांती ओम फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार‎
२००८ बचना ऐ हसीनो
२००९ चांदनी चौक टू चायना
२००९ लव्ह आज कल
२०१० कार्तिक कॉलिंग कार्तिक
२०१० हाउसफुल्ल
२०१० लफंगे परिंदे
२०१० ब्रेक के बाद
२०१० खेलें हम जी जान से
२०११ आरक्षण
२०११ देसी बॉइज
२०१२ कॉकटेल
२०१३ रेस २
२०१३ ये जवानी है दीवानी
२०१३ चेन्नई एक्सप्रेस
२०१३ गोलियों की रासलीला राम-लीला – फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
२०१४ हैप्पी न्यू इयर
२०१५ पिकू – सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर अवॉर्ड
२०१५ तमाशा
२०१५ बाजीराव मस्तानी – सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर

दीपिकाची गाजलेली अफेअर्स…

१) निहार पंड्या – हे दीपिकाचे पहीले प्रेम म्हणावे लागेल. दीपिका निहारसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती, अशी चर्चा होती. दीपिकाच्या स्ट्गलिंगच्या काळात हे अफेअर होते. पण तीन वर्षांनंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

२) उमेन पटेल – निहारनंतर दीपिकाचे नाव उमेनशी जोडले गेले. पण याचदरम्यान तिच्या आयुष्यात नवा तरूण आल्याने दोघांचे सुत फार काळ टिकले नाही.

३) युवराज सिंग – या तरूणामुळे उमेन दीपिकाच्या आयुष्यातून गायब झाला. अनेकदा युवराज-दीपिका एकत्र फिरताना दिसले होते. युवराजपूर्वी दीपिकाच्या आयुष्यात धोनी होता, असे म्हटले जाते. पण युवराजच्या एन्ट्रीने तो बाद झाला. पण दीपिका-युवराजचे अफेअर देखील फार काळ टिकले नाही

४) सिद्धार्थ माल्या – युवराजनंतर विजय माल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्यासोबत दीपिकाचे अफेअर होते. बरीच वर्षे हे अफेअर चालले. प्रेमात पूर्ती बुडालेल्या दीपिकाचे हे रिलेशनशीपही टिकू शकले नाही.

५) रणबीर कपूर – त्यानंतर दीपिकाच्या आयुष्यात रणबीर कपूरची एन्ट्री झाली. एकत्र काम केल्यानंतर दोघांचे प्रेम बहरले. पण त्यानंतर रणबीर कतरिना कैफमध्ये गुंतला आणि दीपिका-रणबीरच्या नात्याला पूर्णविराम लागला.

बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत दीपिका पदुकोणने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. दीपिका यंदाची मोस्ट पावरफुल 100 लोकांची लिस्ट जाहीर केली आहे. यामध्ये नाव येणारी दीपिका पदुकोण ही पहिली बॉलिवूड अभिनेत्री बनली आहे. पद्मावत या सिनेमाबद्दल दीपिकाची लोकप्रियता आणखी वाढली आहे. टाइम्स मॅगझीनने दिलेल्या माहितीनुसार, सर्वात प्रभावशाली असलेल्या व्यक्तींची टाइमची वार्षिक सूची जाहीर केली आहे. या सूचीनुसार आताचा वेळ हा या कलाकारांचा आहे. दीपिकासोबतच यंदा भारतीय क्रिकेट कॅप्टन विराट कोहली आणि ओला कॅबचा को फाऊंडर भावीश अग्रवालचा देखील समावेश आहे.

दीपिका आहे ब्रँड अ‍ॅम्बेसिडेर

दीपिका पदुकोण एका ज्वेलरीची ब्रँड अ‍ॅम्बेसिडेर आहे. हा ब्रँड दीपिकाच्या लग्नासाठी एक्सक्लुझिव्ह ज्वेलरी कलेक्शन लाँच करणार आहे. हा ब्रँड दीपिकासाठी जेवर डिझाईन करणार. पद्मावतमध्येही दीपिका पदुकोण प्रत्येक जेवरमध्ये छान दिसली होती.

नुकताच, दीपिकानं 40 कोटींचा अलिशान फ्लॅट खरेदी केलाय. 2010 साली तिने मुंबईतील सर्वात पॅाश ठिकाणी एक घर खरेदी केलं होतं, त्याच ठिकाणी 30 व्या मजल्यावर आणखी एक अलिशान फ्लॅट दीपिकानं आता खरेदी केलाय. या फ्लॅटचा नंबर 3001 आहे.

आश्चर्याची गोष्ट ही आहे की, दीपीकाने हा फ्लॅाट स्वत:साठी नाही तर आपल्या एका खास व्यक्तीसाठी विकत घेतलाय. तुम्ही विचार करत असाल की, हा फ्लॅट दीपिकानं बॉयफ्रेंड रणवीर सिंगसाठी खरेदी केलाय की काय? पण तसं नाही… दीपिकानं हा फ्लॅट तिचे वडील प्रकाश पदूकोन यांच्यासाठी विकत घेतलाय.

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग म्हणजेच हिंदी कलाविश्वातील ‘राम-लीला’ विवाहबंधनात अडकले असून आता पुढील वैवाहिक आयुष्य ते सुखात जगतात कि नाही याकडे चाहत्यांच नेहमीच लक्ष लागून राहील.