खासदार सुशील मोदींनी राज्यसभेत सांगितला ‘नरेंद्र मोदी’ नावाचा फुल फॉर्म, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपा राज्यसभेचे खासदार सुशील मोदी यांनी राज्यसभा अधिवेशनाच्या चर्चेवेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा एक अर्थ सांगितला आहे. सुशील मोदीं राज्यसभेच्या भाषणावेळी पंतप्रधानांची स्तुती केली आहे. त्यावेळी ते म्हणाले, अर्थव्यवस्थेच्या नुकसानीतून देश पुन्हा सावरू शकतो, परंतु आयुष्य गेलं तर पुन्हा परत आणू शकत नाही असं पंतप्रधानांनी सांगितले. महाभारताच्या शांतिपर्वात म्हटलं आहे की, ‘आपदाग्रस्त जीव प्राण रक्षा ही धर्म है’ केंद्र सरकार याच गोष्टीचं पालन करते, कोरोना संकटकाळात अनेक लोकांची मदत केली गेली असे त्यांनी सांगितले.

तर भारतातील लोकांना लाभ थेट त्यांच्या जनधन खात्यात वेळोवेळी मिळत होता. त्याशिवाय लॉकडाऊन काळात मोदी सरकारने केलेल्या कामाचं कौतुक सुशील मोदींनी राज्यसभेत केले. तसेच नरेंद्र मोदींचे पूर्ण रूप त्यांनी सविस्तर सांगितलं आहे. N- न्यू इंडिया, A- आत्मनिर्भर भारत, R- रिफॉर्म, E- इलेक्ट्रॉनिक एग्रीकल्चर मार्केट, N- न्यू फाइनेंसियल स्ट्रक्चर, D- डिसइनवेस्टमेंट, R- रेलवे, सड़कें, A- एग्रीकल्चर रिफॉर्म. ‘M- एमएसपी एस्योर्ड हेल्प माइग्रेंट वर्कर, O- वन पर्सन कंपनी, D- डाउन टू अर्थ, I- इनक्लूसिव डेवेलपमेंट.

दरम्यान, सुशील मोदींनी संसदेत भाषण करतेवेळी तेव्हा त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला आहे. तर केंद्राने सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं शेअर मार्केटनेही स्वागत केल आहे. तर सर्वाधिक ५१ हजारपर्यंत सेन्सेक्स वधारलं होतं, २३ वर्षानंतरही असं झालं, १९९७ मध्ये माजी अर्थमंत्री पी. चिंदबरम यांच्या भाषणानंतर सेन्सेक्सने शिखर गाठलं होतं, त्याचसोबत मागील २५-३० वर्ष बजेट पाहतोय, यंदाच्या अर्थसंकल्पावर कोणीही टीका केली नाही. देशाने स्वागत केले. लॉकडाऊन काळात मोदी सरकारने ८० कोटी गरिबांना ४० किलो धान्य आणि ८ किलो डाळ दर महिन्याला दिली. २० कोटी महिलांचे जनधन खाते उघडण्यात आले. ७ कोटींहून अधिक महिलांना उज्ज्वला कनेक्शनअंतर्गत गॅस सिलेंडर दिला असंही सुशील मोदींनी सांगितले.