मृत्युच्यावेळी ‘जीवा’ला किती ‘वेदना’ होतात माहित आहे का ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – शंभर इंगळ्या एकावेळी चावल्यावर जेवढ्या वेदना होतात तेवढ्याच वेदना मृत्युच्यावेळी जीवाला होतात. आपण आयुष्यभर खूप संपत्ती कमावतो. काहीजण सात पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती कमावतात. पण आयुष्याच्या शेवटी यापैकी काहीही सोबत येत नाही. सोबत येणारी संपत्ती कामावण्यापासून आपण दूर असतो. सर्व संतांनी सांगितले आहे की भगवंताचे नामस्मरण करा, हे एक भगवंताचे नामच तुम्हाला या जन्ममृत्युच्या फेऱ्यातून वाचवू शकेल. पण आपण याकडे लक्ष देत नाही आणि अधोगतीला जातो.

मरणाच्या दुःखातून आपल्याला आपली बायको, मुलगा, सून कोणीही सोडवू शकत नाही. संत म्हणतात,

अंतःकाळी तुला सोडविना कोणी l एका चक्रपाणी वाचोनिया ll

म्हणजे मरणाच्या दुःखातून सोडवणूक करणारा चक्रपाणी भगवंत आहे. म्हणून आयुष्यभर सोबत न येणारी संपत्ती कामावण्यापेक्षा भगवंताच्या नामस्मरणाची संपत्ती कमवा. संत म्हणतात, चालता-बोलता, बसता-उठता रामकृष्णहरी हा मंत्र जप करा.

रामकृष्णहरी विठ्ठल केशवा l मंत्र हा जपावा सर्वकाळ ll

हा मंत्र जपल्याने काय होईल ? तर, हरी हरी हरी मंत्र हा शिवाचा l म्हणती जे वाचा तया मोक्ष ll, या मंत्रजपाने मोक्ष प्राप्त होईल आणि मृत्यूच्या दुखापासून मुक्ती मिळेल.

मृत्यू हा शब्द जरी उच्चरला तर माणूस भयभीत होतो. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या शरीरातून जीव बाहेर पडताना शंभर इंगळ्या एकावेळी चावल्याचे दुःख होते.

हभप गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत यांचा या विषयावरील दहा मिनिटांचा व्हिडीओ जरूर पहावा, खूप महत्वाचा व्हिडीओ आहे, व्हिडीओ पाहण्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा👇

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/