कामाची गोष्ट ! आता पेटीएमद्वारेही काढता येणार रेल्वेची तत्काळ तिकिटे

नवी दिल्ली : अचानक जर रेल्वेने प्रवास कार्यच म्हंटल तर आयआरसीटीसीवर जाऊन रेल्वेचे तिकिट ( train tickets)  बुक करावे लागते. परंतु, या साईटवर नेहमीच वेटिंग पाहायला मिळते. सीझनमध्ये तर सर्रास तत्काळचाच आधार घ्यावा लागतो. १९९७ पासून ही स्कीम सुरु आहे. तत्काळमध्ये स्लीपर, थर्ड एसी, सेकंड एसी किंवा एक्झिक्युटीव्ह क्लासची तिकिटे काढता येतात. परंतू हे तत्काळ तिकीट पेटीएमद्वारेही काढता येते.

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने तत्काळ तिकिट बुक करण्यासाठी रेल्वेने एसी क्लाससाठी सकाळी १० वाजता एसी क्लास आणि नॉन एसी स्लीपरसाठी ११ वाजताची वेळ दिली आहे. आधी ही वेळ एकच होती. हे तिकिट तुम्ही रेल्वे स्टेशन किंवा IRCTC च्या वेबाईटवर बुक करू शकता. तत्काळसाठी एका पीएनआरवर केवळ चार प्रवाशांचे तिकिट बुक करता येते. एवढे करून सुद्धा सॉफ्टवेअरचा वापर करून तिकिटांचा काळाबाजार केला जातो. असे अनेक प्रकार पकडण्यात आले आहेत.

ट्रेनचा चार्ट तयार होईपर्यंत तत्काळ तिकिट बुक करता येते. अनेकदा चार्ट तयार होईपर्यंत तिकिट वेटिंगवर दिसते आणि चार्ट तयार झाला की ते कन्फर्म होते. तर अनेकदा तिकिट वेटिंगवरच राहते. हे पैसे माघारी दिले जातात. कन्फर्म तत्काळ तिकिट रद्द केल्यास रेल्वे तुम्हाला कोणतेही पैसे देत नाही. तर वेटिंगचे तिकिट आपोआप रद्द होते आणि काही प्रमाणावर चार्ज आकारून रेल्वे पैसे परत करते.

Paytm द्वारे तात्काळ तिकिट बुक करण्याची पद्धत…

पेटीएम अकाऊंट लॉगिन करा. तत्काळ तिकिटची रेल्वेची वेळ होऊन गेली की अर्ध्या तासाने पेटीएमद्वारे तत्काळ तिकिट बुक करता येते. एसी क्लास १०.३० आणि नॉन एसी क्लास ११.३० वाजताची वेळ आहे.