कामाची गोष्ट ! ‘पॅन’ कार्ड हरवलं असेल तर ‘असं’ काढा ‘डुप्लिकेट’ पॅन कार्ड !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आर्थिक व्यवहार म्हटलं तर पॅन कार्ड आलंच. बँकेतही एक लाखांच्या पुढील व्यवहारांसाठी पॅन कार्ड सक्तीचं झालं आहे. आयटी रिटर्न भरतानाही पॅन गरजेचं आहे. अनेकदा पॅन कार्ड गहाळ होण्यच्या घटना होतात. जर तुमचं पॅन कार्ड गहाळ झालं तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करून डुप्लिकेट पॅन कार्ड मिळवू शकता. यासाठी अर्ज कसा करायचा हे आपण जाणून घेणार आहोत.

असं काढा डुप्लिकेट पॅनकार्ड

1) https://www.tin-nsdl.com/ या वेबसाईटला भेट द्या.
2) इथे गेल्यावर तुम्हाला Reprint of असा पर्याय निवडायचा आहे.
3) जर तुम्हाला Reprint of असा ऑप्शन मिळाला नाही तर Service आणि PAN हे पर्याय निवडा. यानंतर स्क्रोल करून Reprint of PAN Card हा ऑप्शन सिलेक्ट करा.
4) पॅन, आधार नंबर आणि जन्मतारीख इत्यादी माहिती द्या.
5) पॅन कार्ड रिप्रिंट करण्यासाठी आधार डेटाचा वापर करण्याची परवानगी देण्यासाठी खालील बॉक्समध्ये सिलेक्ट करा.
6) यानंतर कॅप्चा कोड एन्टर करा आणि सबमिट करा.
7) तुम्हाला तुमची खासगी माहिती कॉम्युटर स्क्रिनवर दिसेल.
8) ईमेल किंवा मोबाईल नंबरचा पर्याय सिलेक्ट करा आणि Generate OTP या ऑप्शनवर क्लिक करा.
9) यानंतर ओटीपी सबमिट करा.
10) जेव्हा ओटीपी कन्फर्म होतो तेव्हा तुम्हाला पेमेंट करण्यासाठी सांगितलं जातं. पेमेंटसाठी Pay Confirm या ऑप्शनवर क्लिक करा.
11) अशा प्रकारे तुमची पेमेंटची प्रोसेस पूर्ण करा.
12) पेमेंटची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर पेमेंट झाल्याचा मेसेज तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईलनंबरवर मिळतो. या मेसेजमध्ये अ‍ॅक्नॉलेजमेंट नंबर असतो. याशिवाय ई – पॅन डाऊनलोड करण्यााची लिंकही यात दिलेली असते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/