फायद्याची गोष्ट ! दररोज करा 63 रुपयांची गुंतवणूक अन् मिळवा 7 लाखांपर्यंतचा परतावा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जीवन विमा महामंडळांने (एलआयसी) नागरिकांसाठी विविध पॉलिसी अंमलात आणते. या पॉलिसी वेगवेगळ्या वर्गाला समोर ठेऊन तयार केलेल्या असतात. लहानग्यांपासून ज्येष्ठापर्यंत एलआयसीमध्ये विविध प्रकारच्या पॉलिसी आहेत. ग्राहकांना भविष्यात मोठी रक्कम जमा होईल, अशा पद्धतीने पॉलिसींना डिझाइन केलेले आहे. एलआयसी ग्राहक टर्म प्लॅन, जीवन विमा आणि एंडोमेंट प्लॅनसारख्या इतर पॉलिसी देते. आज आपण एलआयसीच्या जीवन आनंद (LIC Jeevan Anand ) या पॉलिबद्दल जाणून घेणार आहोत. फेब्रुवारी 2020 मध्ये जीवन आनंद (टेबल नंबर 915) या पॉलिसाला लाँच केले आहे.

सर्वाधिक विक्री होणाऱ्या पॉलिसीपैकी जीवन आनंद एक पॉलिसी आहे. ही पॉलिसी एडोमेंट आणि लाइफ प्लानचे मिश्रण आहे. याअंतर्गत पॉलिसी पीरियडच्या समाप्तीनंतर मॅच्युरिटीवर रिटर्न तर मिळतोच शिवाय जीवनभर सम एश्योर्ड (लाइफ लॉंग कवरेज) देखील मिळणार आहे. ज्यांना गुंतवणुकीनंतर भरपूर रक्कम रिटन्स हवी त्यांच्यासाठी जीवन आनंद पॉलिसी फायद्याची ठरणार आहे.

पॉलिसी घेण्याचे नियम व अटी –
1 ) 18 ते 50 वयाच्या व्यक्तीला या पॉलिसीत गुंतवणूक करता येईल.
2) हा एक लॉन्ग टर्म प्लान आहे. यात पॉलिसीधारक 15 ते 35 वर्षांच्या टर्म प्लानला निवडू शकतात.
3) कमीत कमी एक लाख रुपयांच्या सम एश्योर्डसह या पॉलिसीला खरेदी केले जाऊ शकते.
4) अधिकच्या सम एश्योर्डची कोणतीही अट नाही.
5) बोनसची सुविधाही मिळते.

उदाहरण म्हणून समजून घ्या…
वय : 26
टर्म : 20
डीएबी : 4,00, 000
डेथ सम एश्योर्ड : 5, 00, 000
बेसिक सम एश्योर्ड : 4,00,000

पहिल्या वर्षी प्रिमियम 4.5 टक्केसह : वार्षिक : 23857 (22830 + 1027), अर्धवार्षिक : 12052 (11533 + 519), त्रैमासिक : 6087 (5825 + 262), मासिक : 2029 (1942 + 87), वायएलवी मोड एवरेज प्रिमियम/प्रतिदिन : 65

पहिल्या वर्षीच्या प्रिमियमनंतर 2.5 टक्क्यांसह : वार्षिक : 23344 (22830 + 514), अर्धवार्षिक : 11792 (11533 + 259), त्रैमासिक : 5956 (5825 + 131), मासिक : 1986 (1942 + 44),
वायएलवी मोड एवरेज प्रिमियम/प्रतिदिन : 63 , अंदाजे एकूण देय प्रिमियम: 467393
मॅच्योरिटीच्यावेळी अंदाजे रिटर्न : सम एश्योर्ड : 400000, बोनस : 336000, फायनल एडिशनल बोनस : 28000.

मॅच्युरिटीच्यावेळी एकूण मिळणारी अंदाजे रक्कम : 764000+ 400000 रुपयांचा लाइफ टाइम रिस्क कव्हर
समजा एखादा व्यक्ती 26 व्या वर्षी 4, 00, 000 रुपयांचे सम एश्योर्डची निवड करत 20 वर्षाचा टर्म प्लॅनमध्ये गुंतवणुक करण्यास सुरुवात केल्यास. पहिल्यावर्षी त्या व्यक्तीला 23, 344 रुपयांची गुंतवणूक करावी लागले. म्हणजेच त्याला प्रत्येक दिवसाला 65 रुपये गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर दुसऱ्यावर्षी प्रिमियममध्ये घट होईल. कारण तुमचा टॅक्स दर 2.25 टक्के होईल. त्या व्यक्तीला दुसऱ्या वर्षी प्रत्येक दिवसाला 63 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. हा प्रिमियम 20 वर्षांपर्यंत भरावा लागेल. त्यानंतर मॅच्युरिटीवर 7, 64, 000 रुपये मिळतील.