तुम्हाला माहीत आहे का १० पैकी ७ विवाहित महिला देतात पतीला दगा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एका सर्व्हेमध्ये असे समोर आले आहे की, भारतात १० पैकी ७ महिला त्यांच्या पतीला फसवतात. एक्स्ट्रा मॅरिटल डेटींग अ‍ॅप ग्लीडनने (Gleeden) दिलेल्या सर्व्हेनुसार ही बाब समोर आली आहे की, १० पैकी ७ महिला त्यांच्या पतीची फसवणूक करतात. वैवाहिक जीवन कंटाळवाणं झाल्या कारणाने अनेक महिलांनी त्यांच्या जोडीदाराची फसवणूक केली आहे. अनेक महिलांना घरगुती कामांमध्ये सहभागी व्हायचं नसतं म्हणून त्यांनी जोडीदाराला दगा दिला आहे.

ग्लीडन या डेटींग अ‍ॅपने एक सर्व्हेक्षण केले आहे. या अ‍ॅपने महिला अडल्टरी म्हणजेच व्यभिचार का करतात या शीर्षकाखाली एक सर्व्हेक्षण केले आहे. त्यात खुलासा झाला आहे की, १० पैकी ७ महिला पतीची फसवणूक करतात. धक्कादायक म्हणजे बंगळुरू, मुंबई आणि कोलकाता यांसारख्या महानगरांमध्ये अशा महिलांची संख्या सर्वाधिक आहे असेही या सर्व्हेक्षणात सांगण्यात आले आहे. ग्लीडन या डेटींग अ‍ॅपचे भारतात ५ लाखांहून अधिक युजर्स आहेत.

१३ टक्के महिलांनी केले हे मान्य

याबाबत अधिक माहिती देताना ग्लीडन मार्केटींग एक्सपर्ट सोलेन पॅलेट म्हणाले की, “१० पैकी ७ महिलांचं असं मत आहे की, अनोळखी लोकांसोबत मजा मस्ती केल्यानंतर जोडीदारासोबत त्यांचं नातं अधिक मजबूत झालं आहे.” ५ लाख भारतीय ग्लीडेन युजर्सपैकी २० टक्के पुरुष आणि १३ टक्के महिलांनी त्यांच्या जोडीदाराला फसवल्याचं मान्य केलं आहे.

काय आहे पतीला दगा देण्याचं कारण ?

ग्लीडन या डेटींग अ‍ॅपवर ३४ वर्षांपासून ते ३९ वर्षांच्या विवाहित महिलांचा समावेश आहे. ग्लीडन वापरणाऱ्या जवळपास ७७ टक्के भारतीय महिलांनी त्यांच्या पतीला फसवल्याचे मान्य केले आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनात रस नसल्याने त्यांनी वैवाहिक जीवनाबाहेर एक साथीदार शोधला त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनात नवा उत्साह मिळाला असे त्यांचे म्हणणे आहे.

ग्लीडन हे एक्स्ट्रा मॅरिटल डेटींग अ‍ॅप २००९ मध्ये फ्रान्समध्ये लाँच करण्यात आलं होतं. २०१७ मध्ये हे अ‍ॅप भारतात आलं. दोन वर्षात या अ‍ॅपचे भारतात ३० टक्के सदस्य आहेत. यात अनेक महिलांचा समावेश आहे. याशिवाय याच सर्व्हेक्षणातून अशीही बाब समोर आली आहे की, भारतात जे समलैंगिक लोक पारंपारिक पद्धतीने विवाहबद्ध झाले अशा समलैंगिक लोकांनाही ग्लीडन या अ‍ॅपची मदत मिळत आहे.