मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेणे आरोग्यासाठी घातक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – काही कार्यक्रम असेल किंवा लांबचा प्रवास करायचा असेल तर स्रियांना मासिक पाळीच टेंशन नको वाटत. त्यामुळं अनेक स्रिया कुठं ज्याचं असेल किंवा त्यांना त्या वेळेत मासिक पाळी येण नको वाटत असेल तर त्या मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेतात. यामुळे जेव्हा आपल्याला पाळी नको असेल तेव्हा पाळी येत नाही. परंतु नंतर स्रियांना या गोळ्या घेतल्याने खूप त्रास होतो. आणि आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे मासिक पाळी पुढे ढकलावी. म्हणून स्रिया ज्या गोळ्या घेतात. त्या त्यांच्या आरोग्यावर अनेक वाईट परिणाम करतात.

मासिक पाळी पुढे ढकलावी म्हणून गोळ्या घेतल्यावर होणारे परिणाम पुढीलप्रमाणे
१) मासिक पाळी येऊ नये म्हणून स्रिया ज्या गोळ्या घेतात. त्यामुळे त्यांना खूप ब्लडींन्ग व्हायला लागत. आणि पोट खूप दुखते. ते तुम्हाला सहनही होणार नाही. त्यामुळे तुम्ही या गोळ्या घेणं कटाक्षाने टाळा.

२) या गोळ्या घेतल्यामुळे चेहऱ्यावर केस यायाला लागतात. आणि शरीरातील हार्मोन्स खूप तेजीने वाढतात. यामुळे पण स्रियांना त्रास होऊ शकतो.

३) ३० वर्ष वयाच्या नंतर स्रियांनी या गोळ्या घेऊ नये. त्यांच्या आरोग्याला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो.

४) ज्या स्रियांना मधुमेह आहे. त्या स्रियांनी या गोळ्या घेणे टाळावे. कारण या गोळ्यांनी त्यांना रिअक्शन येऊ शकते.

५) या गोळ्या खाल्याने स्रियांना चक्करही येऊ शकते.

६) मासिक पाळी पुढे ढकलावी. यासाठी जर तुम्ही गोळया खात असाल तर पुढे जाऊन याचा तुमच्या लिव्हरवरही परिणाम होऊ शकतो.