कॅन्सरशी संबंधीत ‘या’ 9 गोष्टी लोकांना महिती नसतात, ‘या’ 5 कारणांमुळं होतो आजार, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  कॅन्सरमुळे संपूर्ण जगात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. या भयंकर आजारातून लोकांना वाचवण्यासाठी जागतिक स्तरावर मोठे प्रयत्न सुरू आहेत. तरीही कॅन्सरबाबत लोकांना जागरूक करणे अवघड होत आहे. कॅन्सरशी संबंधीत काही महत्वपूर्ण गोष्टी आपण जाणून घेणार आहोत, ज्या अनेकांनी कधी ऐकल्याही नसतील.

1. कॅन्सर शब्द लॅटिन भाषेतील ’क्रॅब’वरून घेण्यात आला आहे, ज्याचा अर्थ आहे खेकडा. सुरूवातीला जेव्हा डॉक्टरांना शरीराच्या मेन एक्स्टेंन्शन आणि नसांमध्ये हा रोग आढळला, तेव्हा त्यांनी यास पाहून खेकड्यासारखा म्हटले होते. तेव्हापासून या आजाराचे नाव कॅन्सर पडले.

2. कॅन्सरची सर्वात प्राचीन उदाहरणे इजिप्शियन संस्कृतीत सापडतात. इ. पू. 1600 च्या एडविन स्मिथ पेपर्समध्ये याचे पुरावे मिळाले आहेत. या पुराव्यांनुसार, इजिप्शियन लोक एक खास हत्यार ज्यास फायर ड्रिल म्हटले जात होते, त्याने ब्रेस्ट कॅन्सर काढत असत. मात्र, पुरावे हे सुद्धा सांगतात की, याचा कोणताही उपचार नाही.

3. फुफ्फुसाच्या कॅन्सरने दरवर्षी सर्वात जास्त मृत्यू होतात. धूम्रपानापेक्षा जास्त इंडोर टॅनिंगमुळे स्किन कॅन्सरची प्रकरणे जास्त असतात. अमेरिकेत स्किन कॅन्सरची दरवर्षी 4 लाखापेक्षा जास्त प्रकरणे नोंदली जातात.

4. कॅन्सर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अर्ध्यापेक्षा जास्त कॅन्सर पीडित किंवा यामुळे मरणार्‍यांचा उपचार शक्य आहे. सर्व प्रकारच्या कॅन्सरने दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. यापैकी 80 टक्के मृत्यू कमी किंवा मध्यम उत्पन्नवाल्या देशांत होतात.

5. कॅन्सर हा काही एकटा आजार नाही. 10 वर्षाच्या मेहनतीनंतर शास्त्रज्ञांना समजले की, कॅन्सरचे 200 पेक्षा जास्त प्रकार आणि उप प्रकार आहेत.

6. जमीनीत राहाणार्‍या अफ्रीकन उंदरांच्या शरीरात हयालूरोनान नावाचा घटक अढळतो, जो शरीरात ल्यूब्रिकंटप्रमाणे काम करतो आणि कॅन्सर वाढण्यापासून रोखतो. शास्त्रज्ञांचे हे संशोधन भविष्यात कॅन्सरच्या उपचारात मैलाचा दगड ठरू शकते.

7. काही लोक कॅन्सरचा अर्थ केवळ मृत्यू समजतात. मात्र, वास्तवात असे नाही. संपूर्ण जगात 2 कोटी 80 लाखांपेक्षा जास्त कॅन्सर सर्वाइव्हर स्वत: याचा पुरावा आहेत की, या भयंकर आजारातून बचाव होऊ शकतो.

8. अनुवंशिकदृष्ट्या कॅन्सर वाढण्याचा धोका केवळ 5-10 टक्के असतो. अनुवंशिक कॅन्सरशिवाय स्मोकिंग, अल्कोहल, लठ्ठपणा, खराब जीवनशैली आणि खाणे-पिणे ही कॅन्सरची मोठी कारणे आहेत.

9. ब्रेस्ट कॅन्सरबाबत सुद्धा अनेक लोक अनभिज्ञ आहेत. महिलांमध्ये ही समस्या जास्त असते. डावीकडे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका उजव्या बाजूपेक्षा 5-10 पट जास्त असतो.