गर्भनिरोधक गोळ्यांबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ? महिलांच्या ‘सेक्स लाईफ’ सोबत थेट ‘कनेक्शन’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी अनेक महिला गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन करतात. परंतु दीर्घकाळ याचं सेवन केल्यानं याचा परिणाम थेट महिलांच्या सेक्शुअल लाईफवर पडतो. याशिवाय महिलांना याचे अनेक साईडइफेक्ट्सही भोगावे लागू शकतात. याचबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत

1) ब्रेसटमध्ये सूज -अनेक महिलांना ब्रेस्टमध्ये सूज येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. काही महिला सांगतात यामुळं ब्रेस्टचा आकारही वाढतो. जर अशा गोळ्या खाल्ल्यानं ब्रेस्टला सूज जाणवत असेल तर जेवणातील मिठाचं प्रमाण कमी करायला हवं. याचा तुम्हाला फायदा मिळेल. परंतु जर तुम्हाला जास्त त्रास जाणवत असेल तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा.

2) लो सेक्स ड्राईव्ह – ज्या महिला दीर्घकाळ गर्भनिरोधक गोळ्या खातात त्यांची सेक्स लाईफ देखील प्रभावित होत असते. जर तुम्हाला लो सेक्स ड्राईव्हचा अनुभव येत असेल वेळीच डॉक्टरांसोबत संपर्क साधायला हवा.

3) व्हजायनल डिस्चार्ज – जर महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घट्ट आणि पांढऱ्या रंगाचं डिस्चार्ज होत असेल तर हे हेल्दी आणि नॉर्मल डिस्चार्ज असेल. परंतु खाज, जळजळ किंवा इरिटेशन होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण हे यीस्ट इंफेक्शन असू शकतं. डॉक्टर सांगतात की, गर्भनिरोधक गोळ्या जास्त प्रमाणात खाल्ल्यानंही असा त्रास होऊ शकतो. जर डिस्चार्जचा रंग पिवळा असेल तर वेळीच काळजी घ्या कारण हे बॅक्टेरियल किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड इंफेक्शनचं लक्षण असू शकतं.

4) वजन वाढणं – गर्भनिरोधक गोळ्यांचं जास्त सेवन केल्यानं शरीराचं वजन वेगानं वाढू शकतं. कारण यामुळं शरीरातील विविध भागात फ्लूईड रिटेंशन वाढतं. तुम्हाला अशी समस्या येत असेल तर वेळीच सावध व्हा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

5) डोकेदुखी आणि तणाव – गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन केल्यानं महिलांना डोकेदुखी किंवा मायग्रेनची समस्या येऊ शकते. अनेक महिला तणावाच्या शिकार होतात. जर तुम्हाला असा काही त्रास झाला तर याचा डोस कमी करा. परंतु यावेळी डॉक्टरांचा सल्लाही नक्की घ्या. कारण मनानेच डोस कमी जास्त करणं तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.