का जडते एखाद्यावर प्रेम, तुम्हाला माहित आहे का? Love मध्ये कसे काम करतात ‘हार्मोन’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – माऊंटएलिजाबेथमध्ये प्रसिद्ध वृत्तात म्हटले आहे की, सायन्सनुसार कुणाच्या प्रेमात पडण्याच्या पाठीमागे अनेक कारणे असतात. यामुळे हार्मोन्स मजबूत होतात आणि एखाद्या व्यक्तीकडे कल वाढतो. प्रेमात पडण्याच्या तीन स्टेज असतात ज्यामध्ये लस्ट, अट्रॅक्शन, आणि अटॅचमेंटचा समावेश आहे. सर्व तीन स्टेज वेगवेळ्या हार्मोनल रिस्पॉन्सशी संबंधीत आहेत. याबाबत जाणून घेवूयात…

लस्ट
ही एक शरीराची लिम्बिक सिस्टम आहे. सुरुवातीला हे लैंगिक आकर्षण असते, जे आपण त्या व्यक्तीबाबत अनुभवतो, ज्यामुळे आकर्षण मिळत असते. एस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरोन हॉर्मोन या भावनेसाठी प्रामुख्याने जबाबदार असतात.Norepinephrine किंवा PEA- नैसर्गिक रूपात मिळणारे एम्फॅटेमिन आहे. जे या फन किंवा लस्टचा अनुभव वाढवते अणि भूक कमी करते. अशावेळी एखाद्या खास व्यक्तीच्या प्रति आकर्षण वाढत राहते.

अट्रॅक्शन
येथून टोटल फन सुरू होते. ही स्टेज फर्स्ट बायोलॉजिकल रिस्पॉन्सच्या नंतर सुरू होते. सोबतच ही अनेक हॉर्मोनल रिस्पॉन्सला ट्रिगर करते. एखाद्या व्यक्तीसोबत प्रेमात पडणे वास्तवात शरीरात स्ट्रेस रिस्पॉन्सचे कारण असते. अशावेळी असू शकते की एड्रेनालाईनमध्ये हे शक्य आहे की, तुम्ही ही लक्षणे अनुभवली असावीत. रेसिंग हार्टबीट, तोंड सुकणे, घाम येणे, ही सर्व रिअ‍ॅक्शन एड्रेनालाईनला ट्रिगर करतात. प्रेमात असल्याने शरीराला न्यूरोट्रान्समीटर डोपामाईनचे उत्पादन करण्यास प्रेरित केले जाते. यास हॅप्पी हॉर्मोन समजले जाते. मनात आनंदाच्या भावनेसाठी डोपामाईन जबाबदार असते. यामुळे एनर्जी आणि फोकस वाढतो आणि भूक खुप कमी लागते. अशावेळी व्यक्ती विशेषशी अ‍ॅट्रॅक्शन दिसून येते.

अटॅचमेंट
अटॅचमेंटमध्ये ऑक्सीटोसिन हॉर्मोनचे उत्पादन होते. ऑर्गेज्मच्या दरम्यान ऑक्सीटोसिनचा स्तर वाढतो. हे लोकांना एकमेकांशी बांधण्याचे काम करते. हे जन्मानंतर ताबडतोब आई आणि मुलाच्या नात्यात सुद्धा महत्वाची भूमिक निभावते. हे अनिवार्य प्रकारे स्तनांना दूध सोडण्याचे संकेत देते, जेव्हा बाळाला याची आवश्यकता असते. याशिवाय यामध्ये वासोप्रेसिन नावाच्या हार्मोनचे हॉर्मोनचे सुद्धा उत्पादन होते. हे किडनीत काम करते आणि तहानेला नियंत्रित करते. हे हॉर्मोन सेक्सनंतर ताबडतोब रिलिज होते. तसेच हे सेक्स करणे आणि पार्टनरला पसंत करण्यात महत्वाची भूमिका पार पाडते. याशिवाय हे हेल्दी असते आणि मोठ्या कालावधीपर्यंत रिलेशनशिपच्या बाँडिंगला कायम ठेवण्याचे काम करते.

ब्रेकअप
जेव्हा पार्टनरसोबत ब्रेकअप होतो तेव्हा याची लक्षणे अगोदरपासून दिसून येतात. यामध्ये डोपामाईन हॉर्मोन मेंदूच्या बहुतांश सिस्टमला नियंत्रित करते, यासाठी हे स्वाभाविक आहे की, ब्रेकअपनंतर तुम्हाला ही जाणिव व्हावी की हृदय दुखावले आहे.