‘पुणेरी’ पत्रकाराचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना झटका अन् विचारला ‘अवघड’ प्रश्न !

पोलिसनामा ऑनलाईन, दि. 15 ऑगस्ट : प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याअगोदर सर्वच राजकीय मंडळी खूपवेळा विचार करतात. तसेच ही प्रसारमाध्यमांची मंडळी कोणताही प्रश्न विचारतील, याचा अंदाज राजकीय मंडळी घेत असतात. सध्या ज्या राजकीय लोकांनी मीडिया जर काबीज केला असेल तर त्यांना कोण थेट प्रश्न विचारणार? असाही प्रश्न अनेकांना पडतो. पण, भारतीय वंशाच्या एका पत्रकाराने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारला, अन् ट्रम्प गोंधळात पडले. म्हणून याचे उत्तन न देण्याचे ट्रम्प यांनी टाळलं.

पुण्यात जन्मलेल्या एका भारतीय-अमेरिकन वंशाच्या पत्रकाराने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारून व्हाइट हाऊसच्या पत्रकार कक्षात सर्वांना चकीत केले. शिरीष दाते असे ट्रम्प यांना प्रश्न विचारणार्‍या भारतीय अमेरिकन वंशाच्या पत्रकाराचे नाव आहे. त्यांचा जन्म पुण्यात झाला असून ते ‘हफिंगटन पोस्ट’चे प्रतिनिधी म्हणून व्हाइट हाऊसमध्ये उपस्थित होते.

तुम्ही जे खोटं बोलता, तुम्हाला तुमच्या अप्रमाणिकपणाबद्दल पश्चाताप वाटतो का? असा प्रश्न शिरीष दाते यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विचारला. मागील पाच वर्षांपासून मला ट्रम्प यांना हा प्रश्न विचारायचा होता, असे ट्विटव्दारे दाते यांनी म्हंटलं आहे.

मिस्टर प्रेसिडंट आज तीन-साडेतीन वर्षानंतर, अमेरिकन जनतेशी तुम्ही जे खोटं बोललात. त्याबद्दल तुम्हाला पश्चाताप वाटतोय का? असा प्रश्न विचारला. पत्रकाराकडून असा प्रश्न आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प काहीसे अस्वस्थ झाले. त्यांनी पुन्हा प्रश्न विचारायला सांगितला. त्यावर दाते यांनी पुन्हा तोच प्रश्न केला. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी काहीही प्रतिक्रिया न देता तसेच उत्तर देणं टाळत दुसर्‍या पत्रकाराच्या प्रश्नाकडे वळले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हा प्रसंग अजिबात धक्कादायक नव्हता. कारण, याअगोदर व्हाइट हाऊसमधील पत्रकार परिषदांत ट्रम्प यांचा पत्रकारांबरोबर अनेकदा वाद झालाय. यंदाच्या अखेरीस अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार असून 75 वर्षीय डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळविली आहे. म्हणून ते आता निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. त्यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाकडून जो बिडेन यांचे आव्हान आहे.