कानदुखीनं त्रस्त आहात ? जाणून घ्या ‘हे’ 5 सोपे घरगुती उपाय !

पोलिसनामा ऑनलाइन – अनेकजण असे आहेत ज्यांना कानदुखीचा त्रास असतो. थंडीमुळं किंवा जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळं कानदुखीची समस्या निर्माण होते. आज आपण कानदुखीसाठी काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

1) तेल – मोहरीचं तेल गरम करा आणि काही थेंब कानात टाका. जर मोहरीचं तेल नसेल तर बदामाचं तेलही वापरू शकता. त्यानंही फायदा होईल.

2) कांदा – कांद्याचा रस काढून तो जरासा गरम करावा आणि त्याचे 1-2 थेंब कानात घावलेत.

3) सुती रूमाल – सुती रूमालाचा वापर करत तुम्ही कान शेकला तरीही तुम्हाला आराम मिळेल.

4) कापूस – कान दुखत असेल तर तुम्ही कापसाचा बोळा करून तो कानात घालू शकता.

5) मसाज – हलक्या हातानं कान आणि मानेजवळ मसाज करा. यानंही आराम मिळू शकतो.

ही काळजी आवर्जून घ्या

पिन, उदबत्ती किंवा गुलाची काडी अशा कोणत्याही किंवा इतर वस्तूंनी कान कोरत असाल तर हे करणं आजच बंद करा. यामुळं कानाचं नुकसान होऊ शकतं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.