तुम्हाला नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचे गुलाम बनून राहायचं आहे का ?

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – तुम्हाला नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचे गुलाम बनून राहायचं आहे का ? असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजापध्यक्ष अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली आहे.

राज ठाकरे म्हणाले की, “नरेंद्र मोदी करत असलेल्या गोष्टींपैकी अनेक गोष्टी या त्यांनी हिटलरकडून शिकल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी माध्यमांचं मुस्कट दाबायचं काम केलं आहे. अनेक संपादकांना दाबण्यात आलं आहे. अनेक पत्रकारांच्या नोकऱ्या घालवण्यात आल्या आहे. या सर्व गोष्टी मोदींनी हिटरलकडून शिकल्या आहेत.

त्यांचं मन की बात हा कर्यक्रमदेखील हिटलरचीच स्टाईल आहे. त्यावेळी हिटरल रेडिआेवर बोलायचा. मोदीही आता तेच करत आहेत. हिटलरच्या काळात सोशल मीडिया नव्हता. आता सोशल मीडिया आहे. त्या काळात सोशल मीडिया असता तर मोदींसारखा हिटरलचाही खोटेपणा उघडा पडला असता. तु्म्हाला नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचे गुलाम बनून राहायचे आहे का ?” असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “शहिद जवनांच्या नावावर आजही नरेंद्र मोदी मत मागण्याचं काम करत आहेत. मी साडेचार वर्षांपूर्वीच सांगितलं होतं की, निवडणुकीच्या तोंडावर असे हल्ले घडवले जातील. आणि नेमकं तसंच होताना दिसत आहे. नरेंद्र मोदी आपल्या भाषणात केवळ एअर स्ट्राईकवर बोलतात. जनतेच्या कोणत्याही समस्या किंवा त्यांनी केलेल्या कोणत्याही कामाबद्दल ते बोलत नाही. संबंध नसणारे विषयावर मोदी बोलत असतात” असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.

Loading...
You might also like