धक्‍कादायक ! पोटदुखीबाबत हॉस्पीटलमध्ये गेलेल्या महिलेला डॉक्टरने औषधांच्या चिठ्ठीवर चक्‍क लिहीलं ‘कॉन्डोम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोटात दुखत असल्याने डॉक्टरकडे उपचारासाठी गेलेल्या महिलेल्या डॉक्टरांनी औषधांच्या चिट्ठीवर कॉन्डोम लिहून दिल्याने एकाच खळबळ उडाली आहे. येथील घाटशीला दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या महिलेच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे.

२३ जुलै रोजी एक चतुर्थ श्रेणीतील महिला कर्मचारी पोटदुखीच्या उपचारासाठी दाखल झाली होती. यावेळी त्या महिलेला ‘असरफ बदर’ या डॉक्टरने औषधांच्या ऐवजी कॉन्डोम लिहून दिले. ज्यावेळी हि महिला मेडिकल दुकानात औषध घेण्यासाठी गेली असता तिला हि बाब ध्यानात आली. त्यानंतर झारखंड मुक्ति मोर्चाचे आमदार कुणाल सारंगी यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका मेडिकल टीमचे गठन करण्यात आले असून याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना या दवाखान्याच्या प्रभारी डॉक्टरांनी हा प्रकार निष्काळजीपणामुळे घडल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर राज्यातील डॉक्टरांवर यामुळे डाग लागल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, झारखंडचे आरोग्य मंत्री रामचंद्र चंद्रवंशी यांनी या प्रकरणावर बोलताना म्हटले कि, मला नुकतेच या प्रकरणाविषयी माहिती झाले असून मी आता यावर कोणतेही भाष्य करू शकत नाही.

आरोग्यविषयक वृत्त –