धक्कादायक ! मागील काही दिवसांपासून ‘उपाशी’ असलेल्या तरूणाच्या पोटातून निघाल्या ‘या’ लोखंडी वस्तू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमधील अहमदाबादमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथील जिल्हा रुग्णालयात मानसिकरित्या आजारी असलेल्या रुग्णांच्या पोटाचे ऑपरेशन केल्यानंतर डॉक्टरांना धक्का बसला. या ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांनी त्याच्या पोटातून जवळपास चार किलो लोखंडी वस्तू काढल्या. यामध्ये ४५२ या लोखंडी वस्तू असून बाकीच्या इतर वस्तू आहेत. ऑपरेशननंतर त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दवाखान्यात दाखल झालेल्या या २८ वर्षीय तरुण पोटदुखीची तक्रार घेऊन आला होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्याचा एक्स-रे केला असता त्यांना धक्का बसला. त्याच्या पोटात डॉक्टरांना लोखंडी वस्तू आढळून आल्या. चार डॉक्टरांनी केलेल्या चार तासांच्या ऑपरेशन दरम्यान त्याच्या पोटातून  ४५२ लोखंडाच्या वस्तू काढल्या. याविषयी बोलताना डॉक्टरांनी सांगितले कि, मानसिकरित्या आजारी असलेला हा तरुण मागील सात ते आठ महिन्यांपासून या वस्तू खात होता. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या निगराणीत त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी  अहमदाबादमधील डॉक्टरांनी देखील अशाच प्रकारे मानसिक रोगी असलेल्या एका महिलेच्या पोटातून दीड किलो सोने काढले होते.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like