‘या’ डॉक्टरने तर इज्जतच घालवली, फक्‍त ३० रूपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – कुरळप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णाकडून ३० रुपयांची लाच स्विकारताना आरोग्य अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. डाँ. नितिन बापू चिवटे(वय ४६ रा. इस्लामपूर) असे त्या डॉक्टर चे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. डॉ. चिवटेवर कुरळप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत उपचार असतानाही ऐतवडे खुर्द येथील एका रुग्णाकडे उपचारासाठी चिवटे यांनी पैशाची मागणी केली होती. त्यामुळे या रुग्णाने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारी वरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सापळा लावला होता. त्या रुग्णाकडून ३० रुपये स्विकारताना डॉक्टरला रंगेहाथ पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधकचे पुणे विभागाचे पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे, पोलीस निरिक्षक गुरुदत्त मोरे, जितेंद्र काळे, संजय कलगुटगी, संजय सपकाळ, अविनाश सागर, सारीका साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आरोग्यविषयक वृत्त –