सासवड : वीर येथे डॉक्टरला मारहाण ; सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Doctor beten in saswad ;one arrested

सासवड (नीरा) : पोलीसनामा ऑनलाईन – पुरंदर तालुक्यातील प्रसिध्द श्रीनाथ म्हसोबाचे देवस्थान असलेल्या वीर येथील डॉक्टराला मारहाण केल्याप्रकरणी समीर पोपट इनामदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला सासवड पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेची फिर्याद डॉ. दिपक बाळासाहेब फरांदे यांनी सासवड पोलिस ठाण्यात दिली आहे.

या घटनेबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, डॉ. दिपक बाळासाहेब फरांदे ( सध्या रा.वीर, ता.पुरंदर, मूळ गाव मुरूम, ता.बारामती ) हे आपल्या राहत्या घराबाहेर क्लिनिक मध्ये जाण्यास निघाले असता त्यावेळी आरोपी समीर पोपट इनामदार (रा.वीर, ता.पुरंदर ) यांने रात्री पेशंटला पाहण्यासाठी लवकर का आला नाही ? असे सांगत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी डॉक्टर फरांदे यांचे आई, वडील, पत्नी व भाऊ हे मध्ये आल्यानंतर त्यांनाही मारण्यासाठी दगड उचलला. या पार्श्वभूमीवर डॉक्टर दिपक फरांदे यांनी पेशेंटला तपासले असतानाही मला व माझ्या नातेवाईकाना मारहाण करून शिवीगाळ केली असल्याची फिर्याद आरोपी समीर इनामदार यांच्या विरोधात सासवड पोलिस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

सासवड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार के.एन. माने अधिक तपास करीत आहे.

You might also like