महिलेकडून निवृत्त डॉक्टरची सात लाखांची फसवणूक !

पोलिसनामा ऑनलाईन – महिलांवरील अत्याचाराविरुद्ध चित्रपटात काम करण्याची बतावणी करुन एका महिलेने आर्थिक अडचणीत असल्याचे सांगून एका निवृत्त डॉक्टरला तब्बल 7 लाख 79 हजार रुपयांना गंडा घातला आहे. महिलेने डॉक्टरच्या एका चित्रपटात काम करण्यास होकार दिला होता. त्यामुळे त्यांनी मदतीच्या भावनेतून तिला सहकार्य केले. मात्र आरोपी महिलेने त्यांना गंडा घातला. या प्रकरणी डॉक्टरने दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सेवानिवृत्तीनंतर डॉक्टरांनी महिलांवरील अत्याचाराविरुद्ध ‘निशस्त्र’ नावाचा चित्रपट तयार करण्याचे ठरवले होते. या चित्रपटात कलाकार म्हणून परिचितांनाच ते संधी देणार होते, मात्र चित्रपटात एक दृश्य महिला अत्याचाराचे दाखवायचे असल्यामुळे ते यासाठी एका महिला कलाकाराच्या शोधात होते. गेल्या मे महिन्यात त्यांचा या दृश्यासाठी समाज माध्यमावरून एका महिलेसोबत संपर्क झाला. महिलेने निवृत्त डॉक्टरला त्यांच्या चित्रपटात भूमिका साकार करण्यासाठी होकार दिला. त्यानंतर महिलेने डॉक्टरसोबत मोबाइलवरून संपर्क साधला.

मला कोरोना संकटामुळे आर्थिक अडचण येत आहे, तसेही तुम्ही चित्रपटात काम केल्यानंतर मला रक्कम देणारच आहे. असे सांगून आर्थिक मदत मागितली. डॉक्टरने महिलेला गेल्या मागील पाच महिन्यात वेळोवेळी ऑनलाइन आर्थिक मदत पाठवली. सुमारे 7 लाख 79 हजार 77 रुपये महिलेला दिले आहेत. ही महिला फसवणूक करत असल्याचे लक्षात येताच डॉक्टरने शुक्रवारी सायबर पोलीस ठाणे गाठून हा प्रकार पोलिसांना सांगितला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like