तमिळ अभिनेत्री रायझा विल्सनवर फेशिअल ट्रिटमेंट करणार्‍या डॉक्टराचे स्पष्टीकरण, म्हणाल्या …

पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिध्द तमिळ अभिनेत्री रायझा विल्सन हिला फेशिअल ट्रिटमेंट करणे चांगलेच महागात पडले आहे. चेहऱ्याच्या काही सामान्य उपचारासाठी मी डॉ. भैरवी सेंथिल यांच्याकडे गेले होते. मला सर्जरीची गरज नाही असे सांगून त्यांनी बळजबरीने काही औषधं दिली. त्यामुळे चेहऱ्याला सूज आल्याचे तिने सोशल मिडियावर सांगितले होते. तसेच तिने स्वत:चे काही फोटोदेखील पोस्ट केले होते. संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी टाळाटाळ केल्याचेही तिने म्हटले होते. मात्र आता यावर डॉक्टरांनी त्यांची बाजू मांडत स्पष्टीकरण दिले आहे.

भैरवी सेंथिल या चेन्नईतील प्रसिद्ध डर्मेटोलॉजिस्ट आहेत. त्यांनीच रायझावर डर्मल फिलर्सचा उपचार केला होता. या उपचार पध्दतीमुळे चेहऱ्यावरील त्वचा एक सारखी दिसते. रायझाने यापूर्वीही हा उपचार घेतला होता आणि दुसऱ्यांदा ती यासाठी माझ्याकडे आली होती. डर्मल फिलर्समुळे चेहऱ्यावर थोडी सूज येते. पण आठवडाभरानंतर ही सूज कमी होते, असे मी तीला सांगितले होते. तरीसुद्धा ती माझी बदनामी करत असून उपचाराचे पैस परत मागत असल्याचे सेंथिल यांनी म्हटले आहे. दरम्यान वेलाइल्ला पट्टथारी-2 या चित्रपटातून रायझाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. यात तिने धनुष आणि काजोलसोबत भूमिका साकारली होती. तसेच बिग बॉस तामिळच्या पहिल्या पर्वात तिने भाग घेतला होता.