चक्क डॉक्टरनं केली रूग्ण महिलेकडे शरीरसुखाची मागणी, शिरूर तालुक्यातील घटना

शिक्रापूर  : प्रतिनिधी –   सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असताना डॉक्टरांकडून अनेक वेगवेगळ्या घटना घडत असताना आता शिरूर तालुक्यातील न्हावरा या ठिकाणी रुग्ण महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत महिलेचा विनयभंग केला असल्याची घटना घडली असून सदर डॉक्टरवर शिरूर पोलीस स्टेशन येथे विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने शिरूर तालुक्यात एक च खळबळ उडाली आहे.

शिक्रापूर ता. शिरूर येथील सदर पीडित महिला आजारी असल्याने तिने काही हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले मात्र प्रकृतीमध्ये काही फरक पडत नसल्याने पिडीतेच्या वडिलांनी सदर महिलेला न्हावरा येथील डॉ. रामहरी लाड यांच्या नाथकृपा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते, या हॉस्पिटलमध्ये महिलेवर उपचार सुरू असताना रविवारी रात्रीच्या वेळेस डॉ. रामहरी लाड यांनी सदर पीडितेला तपासणी करायची आहे असे बोलून त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतले त्यावेळी महिला डॉक्टरांच्या केबिन मध्ये आली, यावेळी डॉक्टरांनी महिलेला गुप्तांगातून तपासणी करायची असल्याचे सांगितले, यावेळी पीडितेने माझ्या पालकांना सांगा त्यानंतर पाहू असे म्हटले असता डॉ. लाड यांनी तू कोणालाही काही बोलू नकोस थांब असे म्हणून तिच्याकडे शरीरसुखाची इच्छा व्यक्त करत महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, यावेळी महिलेने डॉक्टरांना ढकलून देत घाबरून डॉक्टरांच्या केबिन बाहेर धाव घेतली आणि आपल्या घरच्यांना फोन करून घडलेली सर्व माहिती सांगितली, त्यानंतर पीडितेच्या पालकांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे धाव घेत घटनेबाबत पोलीसांना माहिती देत याबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली, पीडित महिलेने शिरूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी न्हावरा येथील नाथकृपा हॉस्पिटल चे संचालक डॉ. रामहरी भुजंगराव लाड रा. न्हावरा ता. शिरूर जि. पुणे यांच्याविरुद्ध विनयभंग प्रकरणी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोटे हे करत आहे. तर घडलेल्या घटने बाबत फिर्यादीला फिर्याद देण्यासाठी पोलिसांडून विलंब करण्यात आल्याचा आरोप पिडीतेच्या कुटूंबीयांनी केले आहेत.