आता अॅसिड हल्ला नाही बिघडवू शकणार चेहरा…   

ब्रिटन : वृत्तसंस्था – अॅसिड हल्ल्यात भाजलेलया व्यक्तीचे आयुष्यच त्या अॅसिड हल्ल्यामुळे बदलून जाते. जगभरात कितीतरी महिला अजूनही अॅसिड हल्ल्याच्या शिकार बनतात. पण आता अॅसिड हल्ल्यापासून वाचता येणार आहे. ब्रिटनमधल्या यॉर्कशायरमधील डॉक्टरांनी याबाबतीत एक महत्वाचे संशोधन केले आहे. या संशोधनामुळे अॅसिड हल्ल्यापासून आपल्या चेहऱ्याला वाचवता येणार आहे.
 डॉक्टरांनी एक असं केमिकल शोधून काढला आहे जो महिलांचा अॅसिड अटॅकपासून बचाव करेल. 32 वर्षीय डॉ. अलमस अहमद या मागील 10 वर्षांपासून अशा केमिकल्सवर काम करत आहेत. जे अॅसिडच्या दुष्परिणामांपासून चेहऱ्याचा बचाव करू शकतील. त्यांनी ‘अकेरियर’ केमिकल तयार केलं आहे. हे मेकअपमध्ये मिसळून चेहऱ्यावर अगदी सहज लावणं शक्य होतं. हे अॅसिडमुळे चेहऱ्याच्या होणाऱ्या नुकसानापासून चेहऱ्याचं रक्षण करतं.
अॅसिडप्रूफ मेकअप 
डॉ. अलमस यांना हे केमिकल तयार करण्याची कल्पना तेव्हा आली जेव्हा 2008 मध्ये एका डान्सिंग शोमध्ये सहभागी झालेल्या केसी पाइपरला अॅसिड अटॅकनंतर शोमधून काढून टाकलं. डॉ. अलमसनुसार, हे खास केमिकल फाऊडेशन क्रिममध्ये मिक्स करून लावलं जाऊ शकतं. लवकरचं हे केमिकल वापरून मॉयश्चरायझर आणि सनस्क्रिनसुद्धा तयार करण्यात येणार आहेत.
संशोधनावर खर्च झाले 56 लाख रूपये
डॉ. अलमस यांनी सांगितल्यानुसार, हे केमिकल लिक्विड प्रूफ आहे आणि 400 डिग्री सेंटीग्रेटवरही टिकू शकेल. फार काळ उन्हामध्ये राहिल्यानंतरही किंवा स्विमिंग दरम्यानही याचा प्रभाव कमी होत नाही. मागील एक दशकापासून यावर काम करणाऱ्या यॉर्कशायरमध्ये राहणाऱ्या डॉ. अलमस यांनी सांगितले की, या शोधावर आतापर्यंत 56 लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. भारतामध्येही याची तपासणी सध्या सुरू असून लवकरच हे केमिकल जगभरातील महिलांना वापरासाठी उपलब्ध होणार आहे.
प्रोफेशनसोबत सुरू ठेवला रिसर्च 

डॉ. अलमस यांच्यानुसार, जेव्हा केटीसोबत ही घटना घडली तेव्हा ती यूनिवर्सिटीमध्ये शिक्षण घेत होती. अॅसिड अटॅकची प्रकरणं इतर देशांच्या तुलनेमध्ये आशियाई देशामध्ये अधिक आहेत. त्यांची अशी आशा आहे की, हे केमिकल अॅसिड अटॅक महिलांसाठी फायदेशीर ठरेल. डॉ. अलमास यांनी मेडिकल स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर न्यूरोसर्जरीमध्ये रिसर्च फिजिशियन म्हणून काम केलं आहे. सध्या त्या एका मेडिकल कंपनीमध्ये चीफ इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर म्हणून काम करत आहेत. त्यांनी आपल्या करिअरदरम्यान या केमिकलवर संशोधन करणं सुरू ठेवलं होतं.