‘डॉक्टर’ वडिलांच्या अंत्यविधीसाठी मुलांनी घातली PPE किट, मदतीचा हात न मिळाल्याने सहायक बनून पोहोचले स्मशानात

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : महाराष्ट्रातील घाटकोपर येथे एका वृद्ध डॉक्टरचे रविवारी कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर सकाळी मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी कोणतेही वाहन व सहाय्यकाची व्यवस्था नसल्याने मृताच्या दोन मुलांनी पीपीई किट परिधान केले आणि वडिलांवर अंत्यसंस्कार केले.

परिसरातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संक्रमित एका वृद्ध डॉक्टरला शनिवारी रात्री हिंदू महासभा रुग्णालयात कोविड – 19 केअर सेंटरमध्ये दाखल केले गेले, परंतु त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली आणि रविवारी त्यांचा मृत्यू झाला. यानंतर मृतदेह स्मशानभूमीकडे नेण्यासाठी कोणतेही वाहन व सहाय्यक नसल्याने मृताच्या डॉक्टर मुलाने वाहनाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला पण सोमवारी पहाटेपर्यंत वाहन उपलब्ध नव्हते. त्यांना स्थानिक नगरसेविका अर्चना भालेराव यांना फोन करावा लागला.

दरम्यान, वाहन आल्यावर त्यात मृतदेह ठेवण्यासाठी आणि तो स्मशानभूमीत नेण्यासाठी कोणीही मदतनीस नव्हता. त्यानंतर मृताच्या दोन्ही मुलांनाच पीपीई किट्स घालण्यास भाग पडले आणि पित्याचा मृतदेहास पूर्व घाटकोपर कॉलनीत स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार करावे लागले. अधिकाऱ्याने सांगितले कि, प्रमाणित प्रक्रियेनुसार एखाद्या सहाय्यकाला मृतदेह गाडीत आणि नंतर स्मशानभूमीपर्यंत आणण्यासाठी पीपीई किट घालणे आवश्यक असते. ते म्हणाले की, कोणताही तोडगा न निघाल्यानंतर मृताचे मुलगे व त्यांचे मित्र व ड्रायव्हर यांनी पीपीई किट परिधान केले आणि मृतदेह स्मशानभूमीत नेऊन सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like