गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघात ; डॉक्टरचा मृत्यु, खासदार पुत्र जखमी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात नाशिक येथील डॉ. संजय पोपटराव शिंदे (वय ४५, रा. कामटवाडा, सिडको) यांचा मृत्यु झाला. या अपघातात पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित आणि जतीन संखे हे जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. संजय शिंदे हे रोहित गावित व जतीन संखे यांच्यासह मोटारीने मोखाडा येथून त्र्यंबकेश्वर येथे जात होते. अंजनेरी शिवारात त्यांच्या गाडीचा टायर फुटल्याने शिंदे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले व गाडी पुलाचा कठडा तोडून नाल्यात जाऊन कोसळली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत मोटारीतून शिंदे व इतरांना बाहेर काढले. त्याचवेळी एक गर्भवती महिलेला नाशिकला घेऊन जाणारी १०८ रुग्णवाहिका तेथून जात होती. तिच्यामधून डॉ. शिंदे यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टर तपासणीपूर्वीच शिंदे यांचा मृत्यु झाला. रोहित गावित, जतीन संखे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like