…तर मी ‘डॉक्टरी’ पेशा सोडून देईन ; सुमित्रा महाजन यांना डॉक्टरांनी सुनावले

इंदूर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना सरकारी योजनांची स्तुती करणे चांगलेच महागात पडले. इंदूरमधील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यक्रमात सुमित्रा महाजन यांना डॉक्टरांनी सरकारी योजना कशा चालतात, याचा ट्रेलरच दाखविला. या योजनेचा पैसा डॉक्टर आणि रुग्णालयापर्यंत पोहोचत नाही, असा आरोप डॉक्टरांनी केला.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यक्रमात सुमित्रा महाजन आयुष्यमान भारत योजनेची माहिती देण्यास सुरुवात केली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांना ते पटले नाही. काही डॉक्टरांनी या योजनेची अमंलबजावणी योग्यरित्या होत नसल्याचा आणि रुग्णांना सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या सवलतींचा पैसा रुग्णालयाला पोहोचत नसल्याचा आरोप डॉक्टरांनी केला.
त्यावर महाजन म्हणाल्या, अनेकदा रुग्णांकडून मोठ्या प्रमाणावर पैसा बिलाच्या नावाने वसूल केला जातो. अनेक लोक माझ्याकडे अशा तक्रारी घेऊन येतात. त्यावर डॉ. के. एल. बंडी हे चांगलेच भडकले. त्यांनी महाजन यांच्या हातातील माईक खेचून घेतला आणि म्हटले की, मला एक बिल दाखवा, ज्यात सरासरी बिल तीन ते चार लाख दिले गेले आहे. असे असेल तर मी वैद्यकीय क्षेत्र सोडून देईन. डॉक्टरांना बदनाम केले जात आहे.

योजनांचा पैसा सरकार आम्हाला वेळेवर देत नाही. पैसा वेळेवर मिळण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना काही तरी हवे असते. या परिस्थितीमुळे आज हुशार विद्यार्थ्यांनाही वैद्यकीय क्षेत्रात येण्याची इच्छा नाही़ किमान वैद्यकीय क्षेत्राला तरी सोडा, अशा शब्दात डॉ़ बंडी यांनी महाजन यांना खरीखोटी सुनावली.त्यावर सर्व डॉक्टर आणि उपस्थित भांबावून गेले. सुमित्रा महाजनही त्यावर काही बोलू शकल्या नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like