डॉक्टर पतीची पत्नीने चप्पलेने केली ‘धुलाई’, महिला वकिलासोबत एकत्र पाहिल्याने ‘भडकली’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जमशेदपूरच्या बिरसानगर पोलिस स्टेशन भागातील एका उच्चभ्रू सोसायटीतून एक विचित्र घटना समोर आली आहे. आपल्या पतीसोबत घरात महिला वकिलला एकत्र पाहिल्यानंतर वेगळ्या राहणाऱ्या पत्नीने संतप्त होऊन पतीसोबत महिला वकीललाही जोरदार मारहाण केली. महिलेने चपलेने पती आणि त्यानंतर महिला वकिलाची धुलाई केली. दरम्यान, हा प्रकार बराच वेळ सुरु राहिल्याने पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला.

माहितीनुसार, महिला वकील आपल्या दोन मुलांसोबत त्या महिलेच्या पतीच्या घरात राहत होती. पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या पत्नीला याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. पतीच्या घरी महिला वकील आणि तिची मुले पाहिल्यानंतर पत्नीचा राग अनावर झाला. या महिलेचा विश्वास आहे की, तिच्या पतीचे घरात राहत असलेल्या महिला वकिलाशी अवैध संबंध आहेत. तिचे म्हणणे आहे की, जोपर्यंत संपत्तीची वाटणी आणि त्याच्यापासून घटस्फोट होत नाही, तो दुसऱ्या स्त्रीला स्वतः बरोबर ठेवू शकत नाही.

नवरा-बायको दोघेही व्यवसायाने डॉक्टर असून हुंडा आणि मालमत्तेमुळे त्यांच्यात वाद आहे. यामुळे दोघांच्या घटस्फोटाचे प्रकरण कोर्टात सुरू आहे. पतीच्या म्हणण्यानुसार, महिला वकील त्याची वकील असल्याने ती घरी आली होती. पत्नी त्याच्यापासून वेगळी असून त्यांच्यात वाद सुरू आहे. हे प्रकरण कोर्टात सुरु आहे. तर महिला वकिलाने सांगितले कि, हे तिच्या क्लाईंटचे घर आहे आणि क्लाईंटला भेटण्यासाठी ती तिच्या मुलांसोबत तेथे आली होती.

या प्रकरणी, बिरसनगर पी मारुम यांनी सांगितले की, दोघांमध्ये मालमत्ता आणि इतर वाद असल्या प्रकरणी न्यायालयात आधीच एक खटला सुरु आहे. अश्यात जर पत्नीने डॉक्टर पती आणि महिला वकिलाविरूद्ध तक्रार दाखल केली तर ते नक्कीच कारवाई करतील. पोलिस सध्या या प्रकरणी तपास करत आहेत.