पोस्टमॉर्टमसाठी टेबलवर ठेवला होता मृतदेह, हालू लागले हात – अंगावर उभे राहिले काटे आणि…

बेंगळुरू : उत्तर कर्नाटकच्या बगलकोटमध्ये एका तालुका आरोग्य अधिकार्‍याने जेव्हा समोर पोस्टमॉर्टमसाठी ठेवलेल्या मृतदेहाला स्पर्श केला, तेव्हा मृतदेहाच्या अंगावर काटा उभा राहिला होता. यानंतर पुन्हा डॉक्टरांनी जेव्हा मृतदेहाला स्पर्श केला तेव्हा मृतदेहाचे हात हालताना दिसले. हा प्रकार सोमवारी बगलकोटच्या महालिंगापुर सरकारी हॉस्पीटलमध्ये समोर आला.

शंकर गोंबी नावाचा एक 27 वर्षीय व्यक्ती 27 फेब्रुवारीला महालिंगापुरमध्ये अपघातात जखमी झाला होता. त्यास बेलागवी जिल्ह्यात एका खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आणि दोन दिवस ऑब्जर्व्हेशनखाली ठेवल्यानंतर हॉस्पीटलने त्यास ब्रेन डेड घोषित करत कुटुंबाला त्याची बॉडी घेऊन जाण्यास सांगितले.

यानंतर हा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सोमवारी महालिंगापुरच्या सरकारी हॉस्पीटलमध्ये पाठवण्यात आला पोस्टमॉर्टम करण्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. गलगली यांना देण्यात आली.

डॉक्टर गलगली यांनी हिंदूस्तान टाइम्सला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, हॉस्पीटलमध्ये येताना अनेक बॅनर आणि कटआऊट्स दिसले ज्यामध्ये या व्यक्तीच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली होती. मी या व्यक्तीचा चेहरा ओळखत होतो, परंतु ही आशा नव्हती की तो जिवंत होईल.

हॉस्पीटलमध्ये पोहचल्यानंतर डॉक्टरांनी पाहिले की, त्या व्यक्तीला तेव्हा सुद्धा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. जेव्हा डॉक्टरांनी कुटुंबियांना याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी म्हटले, प्रायव्हेट हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितले की, व्हेंटिलेटर हटवल्यानंतर तो श्वास घेणे सुद्धा बंद करेल.

डॉक्टरांनी सांगितले, कुटुंबाला सांगण्यात आले होते की, एकदा व्हेंटिलेटर हटवले तर व्यक्ती रिसतर मृत घोषित केला जाईल. यासाठी त्यांनी अंत्यसंस्काराची तयारी सुद्धा सुरू केली होती. त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावर व्यक्तीच्या मृत्यूची माहिती सुद्धा दिली होती आणि जेव्हा मी हॉस्पीटलमध्ये पोहचलो तेव्हा तिथे किमान 1000 लोक होते.

त्यांनी पुढे सांगितले, मी अटॉप्सी सुरू केली आणि त्याला स्पर्श केला तेव्हा पाहिले की, त्या व्यक्तीच्या अंगावर काटा उभा राहिला होता, ज्याचा अर्थ होता की, त्याच्या शरीरात हालचाल होत आहे. नंतर मी पल्स-ऑक्सीमीटरने तपासणी केली आणि हार्टबीट सुद्धा पहिले. मी त्यास व्हेंटिलेटरवरून हटवले आणि काहीवेळ वाट पाहिली. मी हे पाहून हैराण झालो की, तो आपले हात हालवत होता. मी तेव्हा त्याच्या कुटुंबाला बोलावले आणि त्यास दुसर्‍या प्रायव्हेट हॉस्पीटलमध्ये दाखल केले.

मंगळवारी सकाळी डॉक्टर गलगली यांना समजले की, गोंबीमध्ये सुधारणा दिसत आहे आणि त्याच्या शरीराचे अवयवसुद्धा व्यवस्थित काम करत आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांनी आपल्या 18 वर्षाच्या करियरमध्ये 400 पेक्षा जास्त पोस्टमॉर्टम केली आहेत, परंतु असे प्रकरण कधीही समोर आले नव्हते.