नागरिकांनी वेळीच उपचार करून घ्यावेत : डॉ. मंगेश वाघ

पुणे : प्रतिनिधी –   कोरोना विषाणूपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी डॉक्टर आपल्या दारी हा स्तुत्य उपक्रम आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावा, गर्दी करू नका, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, कोणताही आजार अंगावर काढू नका, वेळीच उपचार करून घ्या, असा सल्ला हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मंगेश वाघ यांनी दिला.

विठ्ठलनगर जनकल्याण प्रतिष्ठान आणि हडपसर मेडिकल असोसिएशनच्या विद्यमाने भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने लक्ष्मी कॉलनी येथे पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस दिलीप शंकर तुपे यांनी डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. सचिन आबणे, पूना सर्जिकल सोसायटीचे डॉ. चेतन म्हस्के, डॉ. सतीश पनशेट्टी, डॉ. मंदार कुलकर्णी व राकेश नेवे यांनी 450 नागरिकांची आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन केले. याप्रसंगी शैलेंद्र बेल्हेकर, राजेंद्र मारणे, प्रशांत सुरसे, विशाल दिलीप तुपे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like