पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात डॉक्टर महिलेचा विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील उच्चभ्रू परिसरात घराच्या इमारती खाली उभारलेल्या डॉक्टर महिलेचा दुचाकीवरुन आलेल्याने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोरेगाव पार्क परिसरात ही घटना रात्री घडली.

याप्रकरणी 26 वर्षीय डॉक्टर महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या डॉक्टर आहेत. घराच्या इमारतीच्या खालील मुख्य रस्त्यावर त्या भावासोबत उभा होत्या. त्यांना फोन आल्याने त्या फोनवर बोलत होत्या. त्यावेळी समोरील हॉटेलसमोर दुचाकीवर गडद निळ्या रंगाचे जॉकेट घालून उभ्या असलेल्या व्यक्तीने महिलेकडे पाहून अश्लिल हावभाव केले. तसेच, त्या व्यक्तीने चेहऱ्याला रुमाल बांधला होता. तरीही महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. काही वेळाने आरोपी हा महिलेच्या पाठीमागून आला. त्याने महिलेच्या अंगाला हात लावून विनयभंग केला. तसेच तेथून पसार झाला. यानंतर महिलेने आरडाओरडा केला, पण आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला. त्यानंतर महिलेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा घेतला जात आहे. अधिक तपास कोरेगाव पार्क पोलीस करत आहेत.