‘मास्क’ परिधान न करता डझनभर बिकिनी गर्ल्स बरोबर पार्टी करताना दिसले ‘हे’ प्रसिद्ध डॉक्टर, लोकांनी उपस्थित केले प्रश्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नियमांचे अनुसरण करण्याचे आवाहन करणारे एक सेलिब्रिटी डॉक्टर स्वतःच विना मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगचे पालन न करता पार्टी करताना दिसले आहेत. डॉ. माइक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या डॉक्टरचे इंस्टाग्रामवर 40 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या डॉ. माईक यांना ‘हॉट डॉक्टर’ आणि ‘सर्वात सेक्सी डॉक्टर’ म्हणूनही ओळखले जाते. काही नवीन फोटोंमध्ये ते जवळपास डझनभर महिला आणि पुरुषांसह पार्टी करताना दिसत आहेत.

मास्क न परिधान करता डझनभर लोकांसह पार्टी करताना दिसल्यामुळे डॉक्टर माईकला स्वत:च्याच फॉलोअर्सच्या रागाचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की ते स्वतःच स्वत:च्या सल्ल्याचे पालन करीत नाहीत. डेली मेलच्या वृत्तानुसार, डॉक्टरांच्या पार्टीचे फोटो त्यांच्या वाढदिवसाचे आहेत. इंटरनेटवर डॉ.माईक म्हणून ओळखल्या जाणार्‍या डॉक्टरचे पूर्ण नाव माईक वारशावस्की आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ. माईक न्यूयॉर्कहून मियामीला गेले होते. एका फोटोत ते इतर 14 लोकांसह दिसत आहेत. एक सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले की मान्य आहे की हे आपले वैयक्तिक जीवन आहे, परंतु आपण स्वत:ला एक पब्लिक फीगर म्हणून दर्शवतात, म्हणून तुम्ही हाय स्टॅंडर्ड फॉलो केले पाहिजे.

You might also like