कडक सॅल्यूट ! ‘कोरोना’ योद्ध्याची तब्बल 24 तासांची शिफ्ट, चेहर्याची अवस्था पाहून तुम्ही…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या जगभरात 1 कोटी पेक्षा अधिक लोक कोरोना बाधित आहेत तर 6 लाखांपेक्षा अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी डॉक्टर आणि पोलीस फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करत आहेत. जगभरातील सर्वच देशांमध्ये डॉक्टर 24 तास काम करत आहे. त्यामुळे या डॉक्टरांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच एका कोरोना वॉरिअरचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानमधील एका डॉक्टरचा फोटो प्रचंड व्हायरल होत असून हा फोटो एका महिला डॉक्टरचा आहे. या महिला डॉक्टरने आपली शिफ्ट संपल्यानंतर हा फोटो टाकला होता. या फोटोमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर मेहनतीची एक छाप दिसत आहे. हा फोटो बी नुसरत या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या फोटोवर डॉक्टरने, माझी कोव्हिड-19 मधील शिफ्ट संपल्यानंतर मला कदाचित नवीन चेहऱ्याची गरज भासेल, असे कॅप्शन दिले आहे.
हा फोटो प्रचंड व्हायरल होत असून या फोटोला आतापर्यंत 43 हजार पेक्षा अधिक जणांनी लाईक्स केले आहे. हा फोटो पाहून तुम्हीही या कोरोना वॉरियरला सल्यूट कराल. मुख्य म्हणजे अनेक भारतीयांनी या डॉक्टरचे कौतुक केले आहे. लोकांनी या फोटोवर, हे काम धर्माच्या पलीकडे आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.
might need a new face once I’m done with the COVID ward shifts. pic.twitter.com/mSfkqAPukP
— Baakh (@bnusrat) July 20, 2020
might need a new face once I’m done with the COVID ward shifts. pic.twitter.com/mSfkqAPukP
— Baakh (@bnusrat) July 20, 2020
arey major ye pakiatani hain..wahan ki service mat le lena..
— Kabir Chodhry (@ChodhryKabir) July 20, 2020