सॅल्यूट ! PPE किट काढल्यानंतरचा डॉक्टरचा फोटो व्हायरल, फोटो पाहून तुम्हीही व्हाल भावुक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण देश कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत आहे. परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्यामुळे आतापर्यंत दोन लाखांहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशातील आरोग्य व्यवस्थेतवर प्रचंड ताण पडलेला पहायला मिळत आहे. अशा स्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर्स, नर्स यांसह इतर वैद्यकीय कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. सोशल मीडियावर सध्या अशाच एका डॉक्टरचा फोटो व्हायरल होतोय या फोटोमध्ये पीपीई कीट काढल्यानंतर या डॉक्टरांना किती घाम आला आहे, हे दिसते.

हा फोटो डॉक्टर सोहेल यांनी बुधवार, 28 एप्रिल रोजी ट्विटरवर शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, अभिमान आहे की देशासाठी काहीतरी करत आहोत.. सध्या हा फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटोचा कोलाज आहे. यामध्ये डॉक्टर सोहेल यांनी पीपीई किट घातला आहे. तर दुसरा फोटो पीपीई किट काढल्यानंतरचा आहे. यात त्यांचे कपडे घामाने भिजल्याचे दिसत आहे.

त्यांनी हा फोटो ट्विट करताना कॅप्शन दिले की, मी सगळे डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी यांच्याकडून सांगू इच्छितो की, आम्ही आमच्या कुटुंबियांपासून खूप लांब आहोत. कधी कधी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या 1 पाऊल जवळ राहून उपचार करावे लागतात. अशा स्थितीत सगळ्यांनी लस घ्यायला हवी असं मी आवाहन करतो. आता फक्त हेच समाधान आहे, सुरक्षित रहा. आतापर्यंत 57 हजारांपेक्षा अधिक लोकांनी डॉ. सोहेल यांच्या फोटोला लाईक केले आहे. तर 1 हजाराहून अधिक कमेंट्स करण्यात आल्या आहेत.