डॉ. शीतल आमटे आत्महत्येच गूढ ‘गडद’च

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ समाजसेवक कर्मयोगी डॉ. बाबा आमटे यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. गेल्या 4 महिन्यांपासून तपास यंत्रणा डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण काय शोधण्यासाठी झटत आहे. मात्र शीतल आमटे यांच्या टॅब असलेल्या डोळ्यांच्या पासवर्डमुळे टॅब उघडले जात नाही. त्यामुळे तपासातील अडचणी कायम असल्याने आत्महत्येचे गूढ कायम आहे.

डॉ. शीतल आमटे यांच्या टॅबचा पासवर्ड शोधण्यात मुंबई पोलिसांच्या सायबर तज्ज्ञांना अपयश आले आहे. टॅबला असलेल्या डोळ्यांच्या पासवर्डमुळे टॅब उघडता येत नाही. त्यामुळे आता ही जबाबदारी पुण्यातील सेन्ट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे सोपवली आहे. त्यामुळे डॉ. शीतल आमटे यांच्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये नेमक काय आहे. हे आता पुणे सेट्रेल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या तपासानंतरच पुढे येणार आहे. शीतल आमटे यांनी आनंदवनातील राहत्या घरी 30 नोव्हेंबर 2020 रोजी आत्महत्या केली होती. मात्र घातपाताचा कोणताही संशय पोलिसांनी व्यक्त केला नाही. डॉ. शीतल आमटे या मानसिक ताणावाखाली होत्या. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचेही बोलले जात आहे.