संपूर्ण रात्र महिलेला बांधून ठेवत होता ‘डॉक्टर’, काही दिवस करत राहिला ‘रेप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका महिलेचे अपहरण करून अनेक दिवस तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप एका डॉक्टरवर करण्यात आला आहे. डॉक्टर महिलेला पूर्ण रात्रभर बांधून ठेवत होता. स्कॉटलँड मधील एन्गसमधील हा सर्व प्रकार आहे. याव्यतिरिक्त दोन अन्य महिलांचे लैगिक शोषण केल्याचा आरोप देखील डॉक्टरवर करण्यात आलेला आहे.

ग्लासगो उच्च न्यायालयाने डॉक्टर मैथ्यू एडमच्या विरोधात चार्जशीट दाखल केली आहे. डॉक्टरने 2013 ते 2019 दरम्यान अपहरण आणि बलात्कारासारखे प्रकार केले होते. एडम पूर्ण रात्रभर महिलेला बांधून ठेवत होता आणि महिलेला बंदुकीची भीती दाखवून तिच्यावर बलात्कार करत होता, असा आरोप त्यावर ठेवण्यात आला आहे.

डॉक्टरने एका महिलेला जबरदस्तीने औषध खायला घातले होते त्यानंतर महिला बेशुद्ध झाली होती. प्रॉसेक्यूटर यांचे म्हणणे आहे की, जनरल मेडिकल प्रैक्टिशनर म्हणून काम करत असताना एडमने हे कृत्य केले आहे. एडमने मेडिकल सेंटरमध्ये काम करत असताना महिलेवर अटॅक केला होता. मात्र एडमचे वकील टोनी लेनेहनने या सर्व आरोपांना फेटाळून लावले आहे. डॉक्टरच्या विरोधातील सुनावणी मे 2020 मध्ये सुरु होणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/