डॉक्टर पतीचं दुसरीशी ‘लफडं’, ‘नाराज’ पत्नीनं प्रेमिका आणि तिच्या मुलाला ‘जिवंत’ जाळलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानच्या भरतपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका डॉक्टरच्या पत्नीने आपल्या पतीच्या प्रेमिकेला आणि तिच्या सहा वर्षाच्या मुलाला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. य घटनेत या प्रेमिकेचा आणि तिच्या सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. आरोपी महिला अध्या फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसर, हि घटना भरतपूरमधील सूर्या सिटी या कॉलनीमधील आहे. या ठिकाणी डॉक्टर सुदीप गुप्ता यांचे घर असून घरातून धूर निघत असल्याने शेजाऱ्यांनी फायरब्रिगेडला याची सूचना दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत बचावकार्यास सुरुवात केली. आग विझवून दोघांना बाहेर काढले असता त्यांचा मृत्यू झाला होता.

तपासात समोर आले कि, आग लावणारी महिला हि डॉक्टर सदीप गुप्ता यांची पत्नी डॉ. सीमा गुप्ता आहे. तिला आपल्या पतीचे या महिलेबरोबर संबंध असल्याची शंका होती. त्यामुळे या महिलेला आणि तिच्या मुलाला एका खोलीत बंद करून आग लावून दिली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या घटनेमध्ये महिलेला तिच्या आईने मदत केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Visit : Policenama.com