निवृत्त लष्करी महिला डॉक्टरनं केला पतीचा खून, विशाल देखील होते सैन्यात कॅप्टन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिला डॉक्टरने तिच्या पतीचा खून केला. पती सैन्यात सेवानिवृत्त कॅप्टन होते, तर ती महिला देखील सैन्यात डॉक्टर होती. ही घटना मुलांसमोर घडली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मृतक विशाल दिवाण हे सैन्यात कॅप्टन रँकचे सेवानिवृत्त अधिकारी होते आणि त्यांची पत्नी देखील सैन्यात डॉक्टर होती. दिवाणचे कुटुंब राजेंद्र नगर येथील पी अँड टी कॉलनीतील मेपल टाऊनमध्ये राहते. शनिवारी रात्री विशाल दिवाणची पत्नी सबिना रोशनने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. घटनेच्या वेळी शेजाऱ्यांनी मुलांचा ओरडण्याचा आवाज ऐकला आणि पोलिसांना कळविले. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत विशाल यांचा मृत्यू झाला होता.

दोघांचे 14 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सबिना रोशनचा तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला होता. शमशाबादचे डीसीपी प्रकाश रेड्डी यांनी घटनेविषयी सांगितले की, दोघांनी एकत्र मद्यपान केले आणि नंतर भांडण सुरू केले. दरम्यान पत्नीने पतीवर चाकूने हल्ला केला.

मुलांनी पोलिसांना सांगितले की त्यांचे पालक वारंवार भांडत असत. गेल्या महिन्यात विशालने सबीनाला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोघांमध्ये योग्य संभाषण देखील होत नव्हते. सबिनाची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावाही केला गेला आहे. गेल्या 2-3 वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. विशाल दिवाणचा मृतदेह उस्मानिया रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. सबीनाला आयपीसीच्या कलम 302 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.