तपासणीसाठी आलेल्या महिला रूग्णावर डॉक्टरकडून ‘अतिप्रसंग’

मडगाव : पोलीसनामा ऑनलाईन – वैद्यकीय क्षेत्राला आपण खूप महत्त्व देतो. डॉक्टरकीच्या पेशाला काळीमा फासणारी एक घटना गोव्यात घडली आहे. गोव्यात उपचारासाठी आलेल्या एका महिला रुग्णावर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलीसांनी कारवाई करत आंजेलो मास्कारेन्हयस या आरोपीला अटक केली आहे. मास्कारेन्हयस हा ४६ वयाचा आहे.

पीडित महिला आपल्या पतीसोबत ५ दिवसांपूर्वी गोव्यात आली होती. कामगार वर्गातील हे कुटुंब असून ही महिला ५ महिन्यांची गरोदर आहे. तिला सापाने चावल्यामुळे तिला तपासणीसाठी कुडतरी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे संशयित डॉक्टर कामावर होता. त्याने तिच्या तपासणीसाठी तिला खोलीत नेले. त्यानंतर त्याने दरवाजा लावून कडी घातली. आणि तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यानंतर पीडितेने घरी येऊन आपल्या मालकीणीला ही गोष्ट सांगितली. तसंच नवऱ्याला समजल्यावर त्यांनी पोलीसांत तक्रार केली.

दरम्यान, याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलीसांनी अटक केली आहे. भारतीय दंड संहितेंच्या 342, 354, 376 (क, ड) कलमाखाली डॉक्टरविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. संशयिताने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता तो फेटाळून लावण्यात आला. पुढील तपासासाठी त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –