घरात सेक्स रॅकेट चालवित होता डॉक्टर पती, शिक्षिका पत्नीने विरोध करताच केली हत्या

पोलीसनामा ऑनलाईन : उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात तीन दिवसापूर्वी घडलेल्या एका शिक्षिकेच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. घरात सेक्स रॅकेट चालविण्यास विरोध केल्याने पतीने शिक्षिका पत्नीचा हत्येचा कट रचून तिचा काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह त्याच्या डॉक्टर मित्राला अटक केली आहे.

चंदा लुथरा असे हत्या झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती संजय लुथरा आणि डॉ. रजत भारद्वाज यांना अटक करण्यात आले आहे. दोघानाही न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. संजय लुथरा याने तीन दिवसांपूर्वी पत्नी चंदाचा खून केला होता. संजयचा मित्र डॉ. रजत या हत्येच्या कटात सामील होता. आरोपीची कसून चौकशी केली असता त्यांनी चंदाचा खूनाचा धक्कादायक खुलासा केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरठ जिल्ह्यातील शास्त्री नगर सेक्टर नं. 2 रहिवाशी संजय लुथरा आणि डॉ. रजत हे जवळचे मित्र आहेत. संजयची पत्नी शिक्षिका होती. चंदा जेंव्हा मुलांना शिकवण्यासाठी शाळेत जात असत. तेंव्हा हे दोघेही वेश्यांना घरी बोलावून सेक्स रॅकेट चालवत असत. चंदाने अनेकदा या गोष्टीला विरोध केला होता. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून दोघेही चंदाला जीवे मारण्याचा कट रचत होते. त्यानुसार संजय चंदाला नशायुक्त पदार्थ खायला दिला. त्यानंतर दोघांनी मिळून तिची हत्या केली. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण स्पष्ट न झाल्याने नौचंदी पोलिसांनी संजय लूथराला क्लीन चिट दिली. मुलीच्या तक्रारीवरून एसएसपीने चौकशी केली. संजयच्या मोबाइलमध्ये एक फोटो सापडला होता, ज्यामध्ये डॉक्टर महिलेचा गळा दाबताना दिसत आहे. या फोटोच्या आधारे पोलिसांनी डॉ. रजतला अटक केली. घटनास्थळी उश्या, नशायुक्त पदार्थ आणि कपडे आढळून आल्याने ते जप्त केले आहेत. जप्त केलेल्या वस्तू पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहेत.