मयत रूग्णाच्या नातेवाईकाकडून इंदापूरातील डाॅक्टर व अधिपरिचारिकांना मारहाण

इंदापूर – आजीचा मृत्यु झाल्यानंतर व्हेंटीलेटर का काढला या कारणावरून नातवाने राग मनात धरुन इंदापूर शासकीय उपजिल्हा रूग्णांलयात सेवा बजावणारे डाॅक्टर व अधिपरिचारिका यांना मारहाण व शिवीगाळ करून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दील्या प्रकरणी इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंनशिवे रा. इंदापूर. यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दीली आहे.

शंकर सुरेश जाधव.रा.शेळगाव, ता.इंदापूर,जि. पूणे असे मारहाण, शिवीगाव व गोंधळ करणार्‍याचे नाव असुन हिराबाई सुरेश जाधव.(वय ५५) असे मृृत महिलेचे नाव आहे.तर मयत हीराबाईची मुलगी शेवंता सुभाष भोसले यांनी हीराबाई या आजारी असल्याने इंदापूर येथील शासकीय उपजिल्हा रूग्णांलय इंदापूर येथे उपचारार्थ बुधवारी दिनांक १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वा.चे. सुमारास दाखल केले होते.

हिराबाई यांची तब्येत क्रीटीकल असल्याने त्यांची काही एक गॅरंटी नसल्याचे डाॅक्टरांनी हिराबाई यांची मुलगी शेवंता यांना सांगीतले होते.तर हिराबाई यांचेवर इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय डेडीकेटेड कोविड युनिट मध्ये व्हेंटीलेटरद्वारे आॅक्सिजन पुरवठा करून उपचार सुरू असतानाच रात्री ८ वा.चे. सुमारास त्यांचा मृत्यु झाला. हीराबाई मयत झाल्याने त्यांचेवर उपचार करणारे डाॅ.अनिरूद्ध गार्डे यांनी व्हेटींलेटर मशीन बाजुला काढले.व हीराबाई मयत झाल्याचे नातेवाईक शेवंता भोसले यांना कळविले.त्यावेळी शेवंताबाई यांचे भाऊ शंकर जाधव यांनी तुम्ही माझी आई हिराबाई हीचे व्हेंटीलेटर का काढुन घेतला म्हणत डाॅ.अनिरूद्ध गार्डे यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली.

त्यावेळी तेथे सेवा बजावणार्‍या अधिपराचारिका शितल सुधीर सोनवणे,राणी बापू जाधव,सुषमा सतिश भोसले यांनी शंकर जाधव यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने सदर परिचारीका व डाॅ.अनिरुद्ध गार्डे यांना हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली.व मोठमोठ्याने ओरडुन शिवीगाळ करत तुम्ही येथे नोकरी कशी करता तेच बघतो,तुम्हाला खोट्या गुन्ह्यात नाही अडकविले तर माझे नाव बदलुन ठेवा असे म्हणत रूग्णांलयातील साधणांची फेकाफेक करून नासधुस केली असले बाबतची फिर्याद डाॅ.एकनाथ चंदनशिवे यांनी इंदापूर पोलीसात दीली असुन सदर प्रकरणी शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांचे कामात अडथळा निर्माण करणे,सरकारी कर्मचार्‍यांना मारहाण करणे व शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याच्या कारणावरून शंकर सुरेश जाधव.रा.शेळगाव याचे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.