कडक सॅल्यूट : 7 महिन्यांच्या गर्भवती असलेल्या ‘या’ डॉक्टर रोज 60 KM चा प्रवास करूनकरतायेत कोरोनाग्रस्तांची सेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना काळात ड्यूटीवर असलेल्या डॉक्टर सुनीता कंबोजने लोकांना घरीच राहण्याचा आणि मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्या सात महिन्यांच्या गर्भवती असूनही जलालाबाद ते फाजिल्का सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत 60 किमीचा प्रवास रुग्णांच्या काळजीपोटी दररोज करतात. डॉ. सुनीता कंबोजला घरी परतण्यासाठी रात्रीचे 12 वाजले तरीही त्या त्यांची ड्यूटी व्यवस्थित बजावतात कारण त्यांच्यासाठी कर्तव्य सर्वात महत्वाची गोष्ट आहे. दरम्यान, त्यांच्या या उत्कृष्ट आरोग्य सेवेसाठी 15 ऑगस्ट रोजी त्यांना पोलिस डीजीपी पुरस्कार देण्यात येणार आहे.

डॉ. सुनीता म्हणाल्या, ‘कोरोना कालावधीत सर्वात महत्वाचे काम म्हणजे, कोरोना रूग्णांच्या प्रवासाचा इतिहास बघून त्यांना क्वारंटाईन करणे, त्यांचे नमुने घेणे, फील्ड वर्क आणि राज्याचे समन्वय साधणे हे आहेत. विशेष म्हणजे कोरोना रुग्णांची काळजी घेण्यात मी सक्षम आहे याचा मला आनंद होतो.’

डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी म्हणजेच, पृथ्वीवरील देवाचे अवतारच. ते तीन महिन्यांपासून सातत्याने कोरोनाविरूद्ध लढत आहेत. फरक इतकाच आहे की त्यांची वर्दी निळ्या आणि पांढऱ्या रंगाची आहे. घरगुती आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना सकारात्मक आणि निरोगी ठेवण्यासाठी ते झटत आहेत. कोणतीही विश्रांती न घेता ते त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. या साथीचा पराभव करणे हे त्यांचे एकमेव ध्येय आहे.

लुधियानाचे डॉ. अनमोल रत्न आणि त्यांची पत्नी डॉ. मीनल गुप्ता यांनी ‘सर्वात आधी रूग्ण, मग कुटूंब’ असे सांगितले. सुरुवातीपासूनच सिव्हिल हॉस्पिटलचे ईएनटी विशेषज्ञ डॉ. अनमोल रत्न आयसोलेशन वॉर्डमध्ये कर्तव्य बजावत आहेत. कोरोना रूग्णांचे ते ते रोज नमुने घेण्याचे काम करतात. तसेच ते त्यांच्या 4 वर्षाच्या मुलास देखील भेटू शकत नाही. लोकांचे सहकार्य काम करत राहण्याचे धैर्य देते आणि कुटुंब यास समर्थन करते, असे डॉ. अनमोल रत्न म्हणाले.

आता सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रानंतर तामिळनाडूमध्ये आढळत आहेत. दरम्यान देशात 24 तासांमध्ये 418 रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या 16 हजार 893 वर पोहोचली आहे.