डॉक्टरची आठ लाखाची फसवणूक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

निगडी, प्राधिकरण येथे राहणाऱ्या डॉक्टरांना वडिलांच्या नावे असणारा प्रॉव्हिडंट फंड जमा झाल्याचे सांगून, वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे खात्यावर घेऊन सात लाख ९० हजार ४७ रुपयांची फसवणूक केली. हा गुन्हा निगडी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
[amazon_link asins=’B0734T3S43′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2bbaafc7-a46f-11e8-96b6-7f1ea2aa17d3′]

या प्रकरणी डॉ. विकास सिताकांत साळस्तकर (६१, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. स्नेहा सिंग (आयटी इन्स्पेक्टर), रुपा तोमर ( आयटी इन्स्पेक्टर), राजू वर्मा, सुनील गोयल (आयटी ऑफिसर) आणि झा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा गुन्हा एप्रिल २०१८ ते नऊ ऑगस्ट २०१८ दरम्यान घडला आहे.

डॉ. विकास यांना गुन्हा दाखल असलेल्यांनी वेळोवेळी फोन केला. तुमच्या वडिलांचा प्रॉव्हिडंट फंड जमा झाला आहे. ती रक्कम तुम्हाला मिळू शकतो त्यासाठी काही चार्जेस आपणाला भरावे लागतील असे आमिष दाखवून विश्वासात घेतले. वेळोवेळी बँक खाते तसेच एनएफडीच्या माध्यमातून पैसे जमा केले. मात्र कोणतेच पैसे परत न करता फसवणूक केली. तपास निगडी पोलीस करत आहेत.

इतर बातम्या

दाभोलकर हत्येप्रकरणी शिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरच्या चाैकशीची शक्यता ?

नैराश्येतून हॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या 

औरंगाबाद  : भाजपच्या ‘त्या’ ५ नगरसेवकांना अटक