अविश्वसनीय ! ‘या’ व्यक्तीच्या नाकात उगवतोय ‘दात’, ‘एक्स-रे’ पाहून डॉक्टर झाले ‘हैराण-परेशान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये एका व्यक्तीच्या नाकामध्ये दात उगवला असून त्यामुळे त्याला मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या दातामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास व्हायला लागल्यानंतर त्याला या आपल्या नाकामध्ये उगवलेल्या दाताविषयी माहिती समोर आली.

इस शख्स की नाक में उग आया दांत, X-ray देख डॉक्टर भी रह गए दंग

मिळालेल्या माहितीनुसार, चीनमधील झांग बिंसेंग याला मागील तीन महिन्यापासून श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे तो डॉक्टरकडे गेला असता डॉक्टरांनी तपासणी करून एक्स-रे काढण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी एक्स-रे काढल्यानंतर डॉक्टरांना देखील धक्का बसला. नाकामध्ये उगवलेल्या दाताची सावली पडलेली त्यांना दिसून आली. त्यानंतर त्यांनी तपासणी केली असता तो दुसरा दात नाकामध्ये उगवल्याचे आढळून आले.

इस शख्स की नाक में उग आया दांत, X-ray देख डॉक्टर भी रह गए दंग

झांग बिंसेंग हा दहा वर्षांचा असताना तो तिसऱ्या मजल्यावरून पडला होता. त्यावेळी त्याचे दोन दात तुटले होते. त्यानंतर डॉक्टरांना एक दात मिळून आला होता, दुसरा दात मिळून आला नाही. तो दुसरा दात त्याच्या नाकामध्ये अडकून तेथेच तो मोठा झाला.

इस शख्स की नाक में उग आया दांत, X-ray देख डॉक्टर भी रह गए दंग

दरम्यान, 20 वर्षानंतर देखील त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना याची भनक लागली नाही. मात्र आता त्याला त्रास होऊ लागल्याने त्याने डॉक्टरकडे जाऊन याचे ऑपरेशन करून घेतले.

Visit : Policenama.com