सरकार जबाबदारी घेत नसल्याने डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी घेतली राज ठाकरेंची भेट

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाशी लढा देतानाही सरकार जबाबदारी घेत नसल्याने डॉक्टरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेत व्यथा मांडली. सहकारी डॉक्टराचा मृत्यू झाल्यानंतरही सरकराने विमा कवच नाकारल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनानंतर जून महिन्यात आमच्या एका सहकार्‍याचा कोविडमुळे मृत्यू झाला. ते लॉकडाउनमध्ये सतत सेवा देत होते. आम्ही अर्ज केला असता तुमचा डॉक्टर प्रायव्हेड प्रॅक्टिशनर असल्याने विमा देता येणार नाही असे सांगण्यात आले. तुम्ही स्वत:च्या खासगी दवाखान्यात काम करत होता आणि याचा कोविडशी काही संबंध नाही असे अर्जात नमूद करण्यात आले आहे. हे फार निर्दयी प्रकारचे स्टेटमेंट आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलो असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.