धक्कादायक ! रशियात डॉक्टरांनी महिलेच्या तोंडातून काढला 4 फूट लांब साप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तोंड उघडं ठेऊन झोपण्याचा किती वाईट परिणाम होऊ शकतो, हे या रशियन महिलेला विचारा. तिच्या तोंडाला बीळ समजून 4 फूट लांब साप तिच्या शरीरात घुसला. त्या महिलेला जेव्हा श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तेव्हा ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तिच्या घशातून एक पाईप टाकून त्या सापाला बाहेर काढलं. आता तर तुम्हाला समजलं असेल की तोंड उघड ठेऊन झोपण्याचा किती भयानक परिणाम होऊ शकतो. या तर जाणून घेऊ पूर्ण कहाणी….

डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, रशियातील दागेस्तानच्या लेवासी या गावात राहणारी महिला तिच्या घराच्या बागेत झोपली होती. तिचं तोंड उघडं होतं, तेव्हा एक 4 फूट लांब साप तिच्या घशातून शरीरात गेला. ती काही करायच्या आत तो पूर्ण आत गेला होता. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून ती डॉक्टरांकडे गेली.

महिलेला एमर्जेन्सी मध्ये नेऊन जनरल एनस्थिसिया देण्यात आला म्हणजे तिला बेशुद्ध करण्यात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी महिलेच्या घशात व्हिडीओ कॅमेरा आणि लाईटची ट्यूब टाकली. धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टरांनी त्या ट्यूबने सापाच्या एका बाजूला पकडलं आणि त्याला हळूहळू बाहेर काढण्यात आलं.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित असलेला मेडिकल स्टाफ त्या सापाला बाहेर काढत आहे आणि त्या सापाची लांबी पाहून महिला कर्मचारी मागे सरकते. त्या डॉक्टरच्या चेहऱ्यावर भीती दिसून येत आहे. त्यानंतर तो साप मेडिकल बकेट मध्ये टाकला जातो. पण तो साप जिवंत होता की मेलेला हे अद्याप समजू शकलं नाही.

या घटनेनंतर रशियाच्या दागेस्तान प्रशासनाने लोकांना घराच्या बाहेर झोपण्यास मनाई केली आहे कारण रात्रीच्या वेळी साप बाहेर पडण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या महिलेची आणि सापाच्या प्रजातीची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. या घटनेनंतर काही लोकांनी दावा केला आहे की त्यांच्या शरीरात देखील काहीतरी जिवंत फिरत आहे. लेवासी गावात एकूण 11500 लोक राहतात. हे गाव समुद्र सपाटीपासून 4165 फूट उंचीवर वसलेलं आहे.