विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍याला डॉक्टरांनी वाचविले ‘प्राण’; पण त्याने खिडकीतून उडी घेऊन केली ‘आत्महत्या’

अंबाजोगाई (Ambajogai News) : पोलीसनामा (Policenama news marathi) ऑनलाइन – विषारी औषध प्राशन करुन आत्महत्ये (Suicide) चा प्रयत्न करणार्‍याला डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन त्याचे प्राण वाचविले. मात्र, इरेला पेटलेल्या या तरुणाने रुग्णालयातील शौचालयाच्या खिडकीतून उडी मारुन आत्महत्या (Suicide) केली. ही घटना अंबाजोगाई (Ambajogai) मधील स्वाराती रुग्णालया (Swarati Hospital) त घडली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

प्रकाश उत्तम राठोड (वय ३६, रा. साकूड, ता़ अंबाजोगाई) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रकाश राठोड याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शनिवारी २६ जून रोजी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. नातेवाईकांनी त्याला स्वाराती रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत होते. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करुन त्याचा प्राण वाचविले होते.

त्याने काही कृत्य करु नये, म्हणून त्याचे हातही बांधून ठेवले होते. पहाटेच्या सुमारास प्रकाश याने आपले बांधलेले हात कसेबसे मोकळे केले. हाताचे सलाइन काढून टाकले व तो अतिदक्षता विभागाच्या बाहेर आला. समोरच असलेल्या डायलिसिस विभागातील शौचालयात गेला. शौचालयाच्या खिडकीचे गज काढून त्याने पहिल्या मजल्यावरुन खाली उडी मारली. आत्महत्या करण्याच्या उद्देशाने त्याने खाली उडी मारली. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्याला तातडीने पुन्हा अपघात विभागात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Doctors save ‘life’ of a person who tried to commit suicide by consuming poison; But he jumped out the window and committed suicide

हे देखील वाचा

अभिनेता उज्वल धनगरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मराठी कलाविश्वावर शोककळा

Jobs | मराठवाडा कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी पदभरती; जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया