१७ तारखेला संपूर्ण देशातील डॉक्टरांचा संप, आयएमए ची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोलकत्यातील डॉक्टरांच्या मारहाणीच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रातील डॉक्टरांचे राज्यव्यापी आंदोलन झाल्यांनतर यासंदर्भात आणखी एक मोठी बातमी आली आहे. इंडियन मेडिकल अससोसिएशन (IMA) ने आज जाहीर केल्याप्रमाणे १७ जून रोजी संपूर्ण देशाभरतील डॉक्टर संप करणार आहेत. याबरोबरच यावेळी संघटनेने हेदेखील स्पष्ट केले की संपादरम्यान केवळ आपत्कालीन सुविधा चालू राहतील.

इंडियन मेडिकल असोसिएशन ने आज दिल्ली येथे भरविलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले कि, “सुरक्षितता हा आमचा हक्क असून आम्हाला दवाखान्यांमधील डॉक्टरांची सुरक्षितता हवी आहे. कोलकात्त्यातील वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी खूप जास्त घाबरलेले असून रस्त्यांवर हिंसाचार सुरु झालेला आहे. आम्हाला समाजाची साथ हवी आहे.  आमची मागणी आहे कि दवाखान्यातील हिंसेच्या विरोधात केंद्रीय कायदा लागू व्हावा. तसेच कोलकात्त्यातील घटनेच्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे. याचबरोबर १७ जून ला संपूर्ण देशातील डॉक्टर संपावर जातील असेही आम्ही जाहीर करतो, यावेळी केवळ आपत्कालीन सेवा पुरवली जाईल.”

खाजगी हॉस्पिटल्स देखील सहभागी होणार :

आयएमए च्या सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार १७ तारखेला होणाऱ्या देशव्यापी संपामध्ये सर्व खाजगी हॉस्पिलदेखील सामील होणार आहेत. डॉक्टरांना मारहाण होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून आमच्या सुरक्षिततेसाठी कायदा लागू करण्यात यावा. त्यांनी म्हटले कि आत्तापर्यंत १९ राज्यांमध्ये ‘सेंट्रल ऍक्ट अगेंस्ट व्हायलेन्स’ इन हॉस्पिटल्स हा कायदा पास झालेला आहे परंतु कायद्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी अजून एका राज्याने हा कायदा पास करणे आवश्यक आहे. या संपामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. याची आम्हाला जाणीव आहे परंतु आमच्याकडे आता पर्याय नाही. १७ तारखेला सकाळी ६ वाजल्यापासून १८ तारखेला सकाळी ६ पर्यंत संप चालू राहील.

ममता बॅनर्जी डॉक्टरांना धमकावत आहेत – केंद्रीय आरोग्यमंत्री

या मुद्द्यावरून केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मात्र ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत म्हटले आहे कि, “ममता बॅनर्जी यांनी खरे तर संप थांबविण्यासाठी यातून मार्ग काढायला हवा मात्र त्या डॉक्टरांना धमकावत आहेत.” डॉ. हर्षवर्धन आज ममता यांना पात्र लिहून संप थांबविण्यासाठी आवाहन करणार आहेत. तर दुसरीकडे वेगवेगळ्या दवाखान्यांमधील एकूण ४३ डॉक्टरांनी राजीनामे दिलेले आहेत. नॉर्थ बंगाल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, दार्जिलिंग मधील २७ आणि आर जी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, कोलकत्ता येथील १६ डॉक्टरांनी आत्तापर्यंत राजीनामे दिले आहेत.

नेमके काय आहे प्रकरण :

पश्चिम बंगालमधील कोलकत्ता शहरात एनआरएस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका वृद्धाचा हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी दोन डॉक्टरांना मारहाण केली. डॉ. पारिबहा मुखोपाध्याय आणि डॉ. यश टेकवाणी अशी या डॉक्टरांची नावे असून यातील एक निवासी तर एक इंटर्न डॉक्टर आहे. कोलकत्यातील डॉक्टरांना झालेल्या या मारहाणीच्या प्रकरणानंतर संपूर्ण देशातील डॉक्टर एकत्र येऊन आंदोलने करत आहेत.अनेक राज्यांतील डॉक्टरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

महाराष्ट्रातील डॉक्टरांनी आज केले आंदोलन :

महाराष्ट्रातील डॉक्टरांनी देखील आज (दि १४) हेल्मेट घालून आणि काळ्या फिती लावून आंदोलन केले. महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची संघटना (MARD) आणि इंटर्न लोकांची संघटना (ASMI) यांनी मिळून हे आंदोलन केले. या आंदोलनास मोठ्या प्रमाणावर उस्फुर्त पाठिंबा मिळाल्याचे दिसून आले.

 

सिनेजगत

पूनम पांडे म्हणते, माझे फोटो-व्हिडीओ म्हणजे ‘समाजसेवा’

सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘प्रेमभंग’, बॉयफ्रेंडने केलं ‘ब्रेकअप’

‘रॅपर’ हनी सिंगचे ‘हे’ गाणे धुमाकूळ घालणार

#Video : म्हणून बोनी कपूरने सार्वजनिक ठिकाणी घातला होता श्रीदेवीच्या पँटमध्ये हात

 

Loading...
You might also like