चीनची घुसखोरी सिद्ध करणारी कागदपत्र संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवरून ‘गायब’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारत आणी चीन यांच्या अद्यापही सीमा वाद सुरु आहे. नुकतीच दोन्ही देशांच्या लेफ्टनंट जनरल अधिकाऱ्यांची दहा तास बैठक झाली. या बैठकीनंतर देखील चीन पांगोंग लेकजवळी आपल सैन्य मागे घेण्यास तयार नाही. दरम्यान, आता या प्रकरणाच्या संदर्भात संरक्षण मंत्रालयाने अधिकृतपणे कबूल केले आहे की, चीनने भारतीय क्षेत्रात घुसखोरी केली आहे. मात्र, ही कागदपत्रे संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवरून डिलीट करण्यात आली आहेत.

चीनने मे महिन्यात पूर्व लडाखमध्ये घुसखोरी केली. यानंतर दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये झालेल्या संघर्षात भारताचे जवान शहीद झाले. यामुळे दोन्ही देशांतील संघर्ष वाढत गेला. तेव्हापासून दोन्ही देशांतील परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. या चकमकीत भारतीय सैन्याचे कर्नलसह 20 सैनिक शहिद झाले. या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरु झाल्या.

संरक्षण मंत्रालयाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या एका कागदपत्रात असे म्हटले होते की, 5 मे पासून गलवानमध्ये चीनच्या कारवाया वाढल्या आहेत. मंत्रालकडून असेही सांगण्यात आले की, 17-18 मे रोजी चीन सैन्यांन PP 17 A आणि पांगोंग लेकच्या नॉर्दर्न बँकमध्ये घुसखोरी केली होती. मात्र, मंगळवार पासून एमओडी वेबसाईटच्या बातमी विभागात असलेली ही कागदपत्र आता काढून टाकण्यात आली आहे. MoD वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर the URL cannot be Found असा मेसेज येतो.संरक्षण मंत्रालयाच्या कागदपत्रामध्ये असेही म्हटले होते की, हा वाद बराच काळ चालू राहू शकतो.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like