नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनच्या सावत्र भावाच्या हत्येची नवीन स्टोरी आली समोर, जाणून घ्या प्रकरण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनचा सावत्र भाऊ किम जोंग नाम याची मेलशियाची राजधानी क्वाललंपूरच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर नर्व एजंटने २०१७ साली हत्या केली होती. ‘असासिन्स’ नावाने एक डॉक्युमेंट्री अमेरिकन सिने दिग्दर्शक आणि डॉक्युमेंट्री मेकर रेयान व्हॉइन यांनी तयार केली आहे. ज्यात किम जोंग नामच्या हत्येशी संबंधित गोष्टींची चौकशी करण्यात आली आहे. या डॉक्टुमेंट्रीमध्ये अनेक धक्कादायक खुलासेही करण्यात आले आहेत. कारण, रेयान या डॉक्टमेंट्रीमध्ये त्या महिलांनाही दाखवलं आहे ज्या हत्येच्या आरोपात पकडल्या गेल्या होत्या आणि नंतर त्यांची सुटका झाली होती.

किम जोंग नामवर मलेशियाची राजधानी क्वाललंपूरच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर VX नर्व एजंटकडून हल्ला करवण्यात आला होता. काही सेकंदातच त्याचा मृत्यू झाला होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ह कॅमेरात कैद झाली होती. यात दोन महिला इंडोनेशियाची सिती ऐस्याह आणि व्हिएतनामची दोअन थि हुंओंग यांची नावे समोर आली होती. दोन्ही महिलांना ताब्यात घेण्यात आलं होतं. पण त्यांना मलेशिया कायद्यानुसार शिक्षा मिळणार होती. मात्र त्यांनी जे सांगितलं त्यानंतर त्यांना २०१९ मध्ये सोडण्यात आलं. मुळात दोघींना माहितीच नव्हतं की, त्या काय करत आहेत. कारण दोघींना या गोष्टीचा विश्वास देण्यात आला होता की, दोघी एका टीव्ही शो च्या भाग आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांना नॉर्थ कोरिअन एजंटने फसवलं होतं आणि हत्येची घटना घडवून आणली होती. सिती सेस्याहला मार्च २०१९ मध्ये सोडण्यात आलं होतं आणि दोअन थि हुओंगला मे महिन्यात. सिती विरोधात सुरू असलेला हत्येचा आरोप मागे घेण्यात आला होता. आणि हुओंगला साधारण शिक्षा झाली होती. अमेरिकन फिल्म डायरेक्ट रेयान व्हॉइट यांनी त्यांच्या डॉक्युमेंट्रीमध्ये दोन्ही महिलांच्या सुटकेनंतरच्या घटनाक्रमांना प्राधान्य दिलं. या डॉक्युमेंट्रीला त्यांनी ‘असासिन्स’असं नाव दिलं. ही डॉक्युमेंट्री सिनेमागृह आणि ऑन डिमांड व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आली आहे. यात किम जोंग नामच्या हत्येच्या हृश्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या डॉक्युमेंट्रीमधील काही भागांवर दोअनने आक्षेपही घेतला होता.

रेयानसोबत बोलताना दोअन म्हणाली की, तिची व्हिएतनामला परतल्यानंतरही आयुष्य विचित्र झालं आहे. कारण ती व्हिएतनामला आल्यावर लोकांना हसतच भेटली होती. त्यामुळे लोकांना वाटतं की, मी ते सगळं मुद्दामहून केलं होतं. आणि मला त्याचा काहीच पश्चाताप नाही. खरं तर हे आहे की, मला माझ्या जन्मभूमीवर पोहोचल्याचा आनंद झाला होता. पण तो आनंद तिला दुसऱ्या अर्थांनी मिळाला. त्यामुळे मी आतापर्यंत लोकांच्या निशाण्यावर आहे. रेयान सुद्धा हे म्हणाला की दोघीही त्यांच्यावर असलेल्या केसमधून बाहेर पडून आनंदी तर आहेत. पण हेही खरं आहे की, त्यांचं आयुष्य आता आधीसारखं राहिलेलं नाही.